‘इंडियन आयडल’मधील शनमुखप्रिया सतत होतेय ट्रोलिंगची शिकार, म्हणाली, ‘माझ्यावर चांगला परफॉर्मन्स करण्याचा…’


टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडल 12’ हा शो सध्या खूप चर्चेत आहे. या आधी या शोचे 11 भाग प्रसारित झाले आहेत. या शोमधील अनेक स्पर्धक ट्रोल होत असतात. यातील अनेक स्पर्धक वादाच्या भोवऱ्यात अडकतात. तसेच या शोमधील शनमुखप्रिया ही स्पर्धक खूप चर्चेत आहे. अनेक प्रेक्षकांना तिची गाणी आवडतात, तर काहींना तिची गाणी आवडत नाही. काही प्रेक्षक तिच्या गाण्यावर नाराजगी व्यक्त करत तिला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. (Indian ideol contestant shanmukhpriya says she is under lot of pressure to perform well)

प्रेक्षकांच्या ट्रोलिंगची शिकार बनलेली शनमुखप्रिया हिने म्हटले आहे की, या आठवड्याच्या परफॉर्मन्ससाठी ती खूप टेन्शनमध्ये आहे. तिने सांगितले की, या एपिसोडमध्ये ती ‘मेरा दिल’ हे गाणे गाणार आहे. परंतु तिच्यावर खूप तणाव आहे की,‌ ती कशाप्रकारे चांगला परफॉर्मन्स करू शकते. मागील काही दिवसांपासून तिचे चाहते तिच्यावर खूप नाराज आहेत.

शनमुखप्रियावर मागील काही आठवड्यांपासून प्रेक्षक निशाणा साधत आहेत. सोशल मीडियावर तिचे चाहते आरोप लावत आहेत की, ती जुन्या गाण्यांसोबत छेडछाड करते. अनेक प्रेक्षकांनी या शोच्या निर्मात्यांना तिला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी युजरने तिच्यावर चांगलाच निशाणा साधला होता. तिने काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राच्या ‘सात खून माफ’ या चित्रपटातील ‘डार्लिंग’ हे गाणे गायले होते. यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

युजरने तिच्यावर प्रियांकाच्या या गाण्याला बर्बाद करण्याचा आरोप लावला आहे. ट्विटरवर एका युजरने लिहिले की, “इंडियन आयडल वाल्यांनो त्या शनमुखप्रियाला शोच्या बाहेर काढा. ती प्रत्येक गाण्याला खूप चुकीच्या पद्धतीने गात असते.” दुसऱ्या एका युजरने इंडियन आयडलच्या सर्व परीक्षकांना दोषी ठरलले आहे. त्याने सांगितले की, “जर या शोमध्ये नेहा कक्करसारखे परीक्षक आहेत, जे गाण्यांना ओरडून ओरडून गातात,‌ तर स्पर्धकांना तरी काय दोष द्यायचा. या शोमध्ये सगळे असे परीक्षक आहेत. ज्यांची गाणी प्रेक्षकांना आवडत नाहीत, तर या शोच्या स्पर्धकांकडून काय अपेक्षा ठेवावी.”

या शोचा होस्ट आदित्य नारायण याने देखील अनेक वेळा शनमुखप्रियाचा बचाव केला आहे. त्याने म्हटले होते की, “आपण दररोज काय एकच जेवण जेवतो का?? कधीतरी आपल्याला बिर्याणी खावीशी वाटते ना. असेच रोज रोज तीच गाणी ऐकण्यापेक्षा कधीतरी वेगळी तडका असलेली गाणी ऐकायला खूप आवडतात.” या आधी देखील अनेक वेळा त्याने मत मांडले होते.

मागील अनेक वर्षांपासून ‘इंडियन आयडल’ हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मागे एकदा अमित कुमार यांना या शोमधील गाणी आवडली नव्हती. त्यांनी असे सांगितले होते की, या शोचे मेकर्स स्पर्धकांचे उगाच कौतुक करायला सांगतात. यानंतर अनेकांनी यावर त्यांचे मत व्यक्त करून त्यांच्या शब्दांना दुजोरा दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…

-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या


Leave A Reply

Your email address will not be published.