Saturday, June 29, 2024

‘हे’ आहेत अफगाणिस्तान अन् तालिबानवर आधारित आतापर्यंतचे सर्वोत्तम चित्रपट; अजूनही पाहिले नसतील, तर एकदा पाहाच

तालिबानने आपल्या हुकूमशाहीने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. या हुकूमशाही निर्माण करुन येणारा काळ अफगाणिस्तान आणि संपूर्ण जगासाठी अत्यंत धोकादायक असणार आहे. आजच्या आधुनिक युगात जिथे जग मंगळावर पहिली महिला उतरवण्याची योजना करत आहे. त्याचवेळी, त्याच जगामध्ये एक भाग आहे जो महिलांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालत आहे. येत्या काळात अफगाणिस्तानचे भवितव्य खूपच धोक्यात असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दशकांमध्ये अफगाणिस्तान आणि तालिबान बद्दल अनेक उत्तम चित्रपट बनले आहेत, जे बघायलाच हवेत. हे चित्रपट सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन आणि दिग्दर्शनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खूप चांगले आहेत. हे एक मोठे कारण होते, ज्यामुळे या चित्रपटांना प्रदर्शित झाल्यानंतर बरेच यश मिळाले होते. या चित्रपटांना देशात आणि जगातही खूप पसंती मिळाली होती. आज आपण या लेखात अफगाणिस्तान आणि तालिबानवर आधारित सर्वोत्तम चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.

१. १२ स्ट्राँग
मागील काही दिवसांपासून तालिबान अफगाणिस्तानवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना यात यशही मिळाले आहे. या कारणामुळे अनेकांकडून असा अंदाज लावला जात आहे की, या परिस्थितीमुळे या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ‘१२ स्ट्राँग’ हा चित्रपट आपल्याला त्याच तालिबानच्या जुन्या गोष्टींची आठवण करून देतो. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या प्रमुख तळांवर कसा हल्ला केला होता हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात ख्रिस हेम्सवर्थ मुख्य भूमिका साकारत आहे. या व्यतिरिक्त मायकेल शॅनन आणि मायकेल पेन देखील या चित्रपटाच्या एक भाग आहेत. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

२. लोन सर्व्हायवर
साल २०१३ मध्ये आलेला ‘लोन सर्व्हायवर’ हा चित्रपट जून २००५ मधील एका घटनेवर आधारित आहे. जिथे एक अमेरिकन सैन्य दल कुख्यात तालिबान नेता अहमद शाहला पकडण्यासाठी गेले होते. पुढे काय होते ते या चित्रपटात पाहून तुम्ही थक्क व्हाल. या चित्रपटात मार्क वाहलबर्ग मुख्य भूमिकेत आहे.

३. द आउटपोस्ट
‘द आउटपोस्ट’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की, अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर अनेक तालिबानी दहशतवादी संघटनेने अचानक हल्ला केला. यादरम्यान, यूएस लष्कराची एक छोटी टीम अनेक तालिबानी दहशतवाद्यांशी लढते. पुढे काय होते? हे सर्व या चित्रपटात दाखवला आहे. त्यामुळे तुम्ही हा चित्रपट जरूर पाहावा.

४. झिरो डार्क थर्टी
साल २०१२ मध्ये आलेला ‘झिरो डार्क थर्टी’ हा चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडला होता. हा चित्रपट कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या तपासापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतची सर्व कथा सांगतो.

५. रेस्ट्रेपो
टीम हेथरिंग्टन दिग्दर्शित ‘रेस्ट्रेपो’ हा डॉक्युमेंटरी चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. अफगाणिस्तान युद्धाच्या वेळी एका अमेरिकन सैनिकाच्या युद्धाचा अनुभव या चित्रपटात अतिशय बारकाईने दाखवण्यात आला आहे. अफगाणिस्तानमध्ये जशी चूक व्हिएतनाममध्ये केली होती. तशीच अफगाणिस्तानमध्ये ही अमेरिका करत आहे हे डॉक्युमेंट्रीने दाखवले आहे.

६. रॅम्बो
हा चित्रपट आपल्याला अफगाणिस्तानची जुनी कथा दाखवतो, जेव्हा सोव्हिएत युनियनने तेथे आक्रमण केले होते. या चित्रपटात नायक एका मिशनवर निघाला आहे, जिथे त्याला सोव्हिएत सैन्यापासून त्याच्या मित्राची सुटका करायची आहे. पुढे काय होते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

७. द डिक्टेटर
‘द डिक्टेटर’ या चित्रपटात भरपूर विनोद पाहायला मिळेल. या चित्रपटात अलादिन जो एक हुकूमशहा बनला आहे. अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. त्याचवेळी, तो एका गुप्त आण्विक मोहिमेवरही काम करत आहे. ज्याचा हेतू इस्रायलवर हल्ला करणे असा आहे. हे सर्व घडताना पाहून संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद या प्रकरणी हस्तक्षेप करते आणि अलादिनला यूएन मुख्यालयात संबोधित करण्यासाठी बोलावले जाते.

या चित्रपटात पुढे काय होते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

-प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

-सैफ अली खानने भाड्याने दिले त्याचे फॉर्च्युन हाइट्समधील घर; ‘इतके’ पैसे मिळूनही दरवर्षी वाढत जाणार रेंट

हे देखील वाचा