अनेक सेलिब्रिटी अपत्यप्राप्तीसाठी सरोगसीसारख्या पद्धतीचा वापर करत असतात. सरोगसी म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणत्या बॉलिवूड स्टार कलाकारांनी या पर्यायाचा वापर करून आपल्या मुलांना जन्म दिला आहेत याची माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
पती-पत्नी काही वैद्यकीय कारणांमुळे किंवा अन्य कारणांमुळे आपल्या मुलाला जन्म देऊ शकत नाही, त्यासाठी त्यांना सरोगसीचा पर्याय सुचवला जातो. सरोगसी म्हणजे स्त्रीचा गर्भाशय भाड्याने घेणे. पत्नीला गर्भाशयाचा आजार असल्यास किंवा पती-पत्नीपैकी एखाद्या व्यक्तीमध्ये काही कमतरता असल्यास मूल होऊ शकत नसल्याने किंवा गर्भपात झाल्यामुळे काही दाम्पत्य मूल जन्माला घालू शकत नाही. मात्र, त्यांच्यासमोर सरोगसीचा पर्याय असतो. सरोगसीमध्ये ज्यांना मुल हवं आहे, अशा दाम्पत्यांमध्ये आणि सरोगेट आईमध्ये एक करार केला जातो. त्यानुसार मूल जन्माला आल्यानंतर त्या बाळाचे पालकत्व त्या दाम्पत्याचं असतं. मात्र, मूल होईपर्यंत संपूर्ण नऊ महिने सरोगेट आईची काळजी घेण्याची जबाबदारी त्या दाम्पत्याची असते.
आजच्या काळात सरोगसीबद्दल सर्वांना माहिती आहे. खऱ्या अर्थाने सरोगसीला लोकप्रिय करण्याचे श्रेय हे बॉलिवूड चित्रपटांना जातंच त्याचप्रमाणे काही सिने तारकांनादेखील तितकंच जात.
प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने सरोगसीचा पर्याय स्वीकारला आणि आज तो जुळ्या मुलांचा पिता आहे. यश आणि रुही ही त्याच्या मुलांची नावे आहेत. बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान याला दोन मुले असताना देखील त्याने आपला तिसरा मुलगा अबराम याच्या जन्मासाठी सरोगसीचा अवलंब केला होता आणि यासाठी प्रसारमाध्यमांद्वारे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. गौरी खान हिने आर्यनला जन्म दिल्यानंतर काही वर्षांनी सुहाना देखील जन्माला आली. परंतु सुहानानंतर काही वर्षांनी गौरीला गर्भधारणा करण्यात अडचण येत असल्याने अबरामच्या जन्मासाठी सरोगसीचा पर्याय त्यांच्यामार्फत निवडला गेला आणि २०१३ साली सरोगसीच्या माध्यमातून अबरामचा जन्म झाला.
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी देखील आपल्या मुलाला म्हणजेच आझाद राव खान याला सन २०११ मध्ये सरोगसीद्वारे जन्माला घातले होते.
https://www.instagram.com/p/BslJDv2A6Lo/?utm_source=ig_web_copy_link
यासोबतच बॉलिवूडची सर्वात तंदुरुस्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शेट्टीचं नाव घेतलं जातं. २०१२ मध्ये तिचा मुलगा वियानच्या जन्मानंतर काही वर्षांनी तिला आई होण्याची प्रचंड ईच्छा होती. परंतु आपल्या सततच्या आजारपणामुळे तिला आई होता येत नसल्याने तिने देखील सरोगसीचा पर्याय निवडला आणि २०२० मध्ये समिषाचा जन्म झाला.
मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे हे सुद्धा काही कारणास्तव माता पिता होऊ शकत नसल्याने त्यांनी सुद्धा सरोगसीचा पर्याय निवडला. तब्बल १४ वर्षांनी २०१८ मध्ये त्यांनी एका गोड मुलीला जन्म दिला.
सरोगसी द्वारे एकता कपूर, तुषार कपूर, सनी लिओनी, लिसा रे, फराह खान, सोहेल खान अशा अनेक दिग्गज कलाकारांना या माध्यमातून अपत्यप्राप्ती झाली असून आता ते सुखी समाधानी आयुष्य जगत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
किंग खानचा झाला स्टंट किंग, शाहरुख खानचा ‘हा’ स्टंट पाहून तुम्हीही आश्चर्याने घालालं तोंडात बोटं
शिल्पा शेट्टीला शुभेच्छा देणं पडलं भलतंच महागात, चाहत्यांनी चांगलेच घेतले फैलावर
अरे बापरे! फराह खान होती करण जोहरच्या प्रेमात, तांत्रिक अडचण सांगत ‘त्याने’ नाकारला प्रस्ताव