किंग खानचा झाला स्टंट किंग, शाहरुख खानचा ‘हा’ स्टंट पाहून तुम्हीही आश्चर्याने घालालं तोंडात बोटं


बॉलीवूडचा किंग शाहरुख खान हा त्याच्या रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखला जातो. याचमुळे त्याला किंग ऑफ रोमान्स म्हटले जाते. पण शाहरुख दुसरे सिनेमेच करत नाही की असे नाही. शाहरुखने त्याच्या कारकिर्दीत अनेक ऍक्शन सिनेमे देखील केले आहेत. शिवाय तो चित्रपटांमध्ये स्टंट्स करताना देखील दिसतो. मुख्य बाब म्हणजे शाहरुख त्याचे स्टंट स्वतः करतो.

झिरो सिनेमांच्या प्रदर्शनानंतर शाहरुख कोणत्याच सिनेमात दिसला नाही. मात्र आता लवकरच तो ‘पठाण’ या सिनेमात दिसणार आहे. सध्या शाहरुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त वायरल होत आहे. यात शाहरुख एक अवघड स्टंट करताना दिसत आहे. शाहरुख सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सेटवरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असतात. त्यामुळे शाहरुखचा हा व्हिडिओ देखील त्याच्या आगामी सिनेमाचा आहे का? असा प्रश्न त्याच्या फॅन्सला पडला आहे.

हा व्हिडिओ शाहरुख खानच्या प्रोडक्शन कंपनीने म्हणजेच रेड चिलीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखने कॅज्युअल ड्रेस घातला असून, तो हवेमध्ये एक खतरनाक स्टंट करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियासोबतच इंटरनेटवरही तुफान वायरल झाला आहे. आता पर्यंत या व्हिडिओला लाखो व्युज मिळाले असून शाहरुखचे फॅन हा व्हिडिओ पाहून आश्चर्याने तोंडात बोटं घालत आहे.
शाहरुख सध्या पठाण चित्रपटाची शूटिंग करत असून यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांचा एकत्र चौथा सिनेमा असणार आहे, यायाधी त्यांनी ओम शांति ओम, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईयर या सिनेमांमध्ये काम केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.