प्रेमासाठी वाट्टेल ते! काहींनी पहिल्या जोडीदाराला दिला होता घटस्फोट तर काहींना अनेक वर्ष लपवलं होतं आपलं प्रेम


फेब्रुवारी महिना सुरु झाला की, सगळयांना वेध लागतात ते १४ फेब्रुवारी या दिवसाचे. १४ फेब्रुवारीला साजरा होणार व्हॅलेंटाईन डे हा सर्वच प्रेमवीरांसाठी एखाद्या सणांपेक्षा कमी नसतो. आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा आणि आपल्या जोडीदारासमोर प्रेमदिन साजरा करण्यासाठी सर्व तरुण, तरुणी किंबहुना सर्वच वयोगातील प्रेमी युगलं ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. आज आपण प्रपोज डेच्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतल्या अशा काही जोड्या बघणार आहोत, ज्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडल्या, आणि त्यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांशी लगीनगाठ बांधली.

जावेद अख्तर आणि शबाना आजमी
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांची प्रेम कहाणी खूप मजेदार आहे. शबाना ह्या जुन्या काळातील प्रसिद्ध शायर आणि गीतकार कैफ़ी आज़मी यांच्या कन्या. या दोघांची पहिली भेट शबाना यांच्या घरी झाली. जावेद नेहमी शबाना यांच्या घरी त्यांच्या वडिलांना कैफी आजमी यांना भेटायला जायचे. जावेद हे कैफी आजमी यांच्या कवितांचे खूप मोठे चाहते होते. त्यासाठी ते नेहमी त्यांच्या घरी जायचे आणि त्यांना भेटायचे. त्यावेळी जावेद यांचा हनी इराणी यांच्यासोबत निकाह झाला होता, आणि त्यांना फरहान अख्तर, जोया अख्तर ही दोन मुलं देखील होती. या दरम्यान शबाना आणि जावेद यांची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र शबाना यांच्या आईला हे नाते मान्य नव्हते. यातच जावेद यांनी १९७८ साली हनी यांना घटस्फोट दिला. त्यानंतर १९८४ साली शबाना आणि जावेद यांनी मुस्लिम पद्धतीने लग्न केले.

नीतू कपूर आणि ऋषि कपूर :
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल म्हणून नीतू कपूर आणि ऋषि कपूर ओळखले जातात. या दोघांची लव्हस्टोरी आणि त्यांचे प्रेम हे सर्व प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा आणि हेवा वाटावा असा विषय आहे. ‘जहरीला इंसान’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. या सिनेमाच्या शूटिंग वेळी ऋषीजी नितु यांना खूप त्रास द्यायचे. ते नेहमी नितु यांची छेड काढायचे. त्यामुळे नितु खूप चिडायची, मात्र काही काळाने त्याना ह्या सर्व गोष्टी आवडू लागल्या आणि त्यांना जणू या सर्वांची सवयच झाली होती. त्या ऋषीजी यांच्या घरी देखील जायच्या. एकदिवस अचानक राज कपूर यांनी ह्या दोघांना सांगितले की, जर मामला गंभीर असे तर लवकरच लग्न करा. त्यानंतर एक दिवस ऋषीजींनी नितु यांना प्रपोज केले, आणि त्यांचे लग्न झाले. आज जरी ऋषीजी या जगात नसले तरी नितु यांच्या मनातून ते गेले नाहीये. ऋषीजी यांच्या आजारपणांत नितु सतत त्यांच्यासोबत होत्या.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा :
रितेश आणि जेनेलिया हे बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या दरम्यान झाली. ह्या दोघांचाही हा पहिलाच सिनेमा होता. सुरुवातीला हे दोघं खूप शांत असायचे बोलायचे नाही. मात्र चित्रपटाच्या शूटिंग नंतर त्यांना त्यांचे प्रेम जाणवले. त्यांनी संपूर्ण जगापासून लपवून ८ वर्ष एकमेकांना डेट केले. या दरम्यान ना रितेशच्या आयुष्यात कोणी आले, नाही जेनेलियाच्या. २०१२ साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज या दोघांना दोन मुलं असून हे चौघं आनंदाने राहत आहे.

अनुपम खेर आणि किरण खेर :
अनुपम आणि किरण हे हिंदी सिनेमातील उत्कृष्ट कलाकार आहेत. ते चांगले आई, बाबा देखील आहेत. या दोघांची प्रेमकहाणी चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. या दोघांची पहिली भेट चंदीगडमध्ये झाली. त्यावेळी यांची मैत्री देखील झाली. मात्र १९८० साली किरण कामाच्या शोधात मुंबईत आल्या. येथे त्या गौतम बेरी या उद्योगपतीच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केले. तर तिकडे अनुपम यांनी मधुमालती यांच्याशी लग्न केले. पण हे दोघेही त्या लग्नात यशस्वी झाले नाही, आणि त्यांनी घटस्फोट घेतला. पुन्हा जेव्हा यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी काही काळाने लग्नाचा निर्णय घेतला आणि १९८५ साली लग्न केले.

हेही वाचा-
रिललाईफमध्ये दीर-भावजयी, बहीण- भाऊ झालेल्या जोड्या रिअल लाईफमध्ये झाल्या पती-पत्नी, पाहा कोण आहेत त्या जोड्या
कलाकार झाले सुप्परहिट, अन् बहीण भाऊ झाले सुपर डुप्पर फ्लॉप! बॉलीवूडच्या हिट-फ्लॉप जोड्यांचा इतिहास
अजय-काजोल पासून ते रितेश-जेनेलिया पर्यंत या आहेत रील आणि रियल लाईफ जोड्या


Leave A Reply

Your email address will not be published.