Friday, March 29, 2024

‘डीडीएलजे’ चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण; ‘या’ अभिनेत्याने नकार दिल्याने शाहरुख बनला ‘किंग ऑफ रोमान्स’

‘बडे- बडे देशों में ऐसी छोटी- छोटी बाते होती रहती है’, हा डायलॉग ऐकल्यानंतर तुम्हाला कोणता चित्रपट आठवतो? असा प्रश्न विचारल्यावर सर्वांचे उत्तर एकच असेल, ते म्हणजे ‘डीडीएलजे’ अर्थातच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ होय. या चित्रपटाने तरुणाईला अक्षरश: वेड लावले होते. या चित्रपटाला बुधवारी (२० ऑक्टोबर) २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट २० ऑक्टोबर, १९९५ रोजी प्रदर्शित झाला होता. आदित्य चोप्रांच्या या चित्रपटाने शाहरुख खानला ‘किंग ऑफ रोमान्स’ बनवले होते.

शाहरुख आणि काजोलने साकारलेल्या राज आणि सिमरनच्या भूमिकेने मोठ्या पडद्यावर चांगलीच वाहवा मिळवली होती. याची जादू आजही प्रेक्षकांवर पाहायला मिळते. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने अनेक फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावावर केले होते. या चित्रपटाच्या यशाने शाहरुखच्या कारकिर्दीला ‘चार चाँद’ लावले. मात्र, राज ही भूमिका शाहरुखपूर्वी सैफ अली खानला ऑफर करण्यात आली होती. (Superstar Shahrukh Khan Kajol Starrer Film Dilwale Dulhania Le Jayenge Turn 26 Years)

चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा चित्रपटातील मुख्य अभिनेत्यासह सर्व पात्र प्रसिद्धीच्या झोतात आले होते. असे असले, तरीही हा चित्रपट बनवताना कोणीही विचार केला नव्हता की, हा चित्रपट एवढा गाजेल. माध्यमांतील वृत्तानुसार, यश चोप्रांनी जेव्हा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपट बनवण्याचा विचार केला, तेव्हा त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून सैफ अली खानला घेण्याचा विचार केला होता. कारण त्यांना वाटले की, इंडो अमेरिकन अफेअरच्या या कहाणीमध्ये सैफ फिट होईल. मात्र, सैफने कोणत्यातरी कारणामुळे या चित्रपटाला नकार दिला आणि अशाप्रकारे हा चित्रपट शाहरुख खानला मिळाला.

हा चित्रपट प्रदर्शित होताच शाहरुखला प्रसिद्धीच्या त्या शिखरावर पोहोचला, जिथे प्रत्येक मुलगी आपल्या स्वप्नातील राजकुमार राजप्रमाणेच असण्याचे स्वप्न पाहू लागली.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातील एकेक सीन आणि डायलॉगवर चित्रपटगृहात बसलेल्या प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा पाऊस पाडला. मग ते अमरीश पुरी यांचे आपली मुलगी सिमरनला ‘जा सिमरन जा…जी ले अपनी जिंगदी’ हा डायलॉग असो किंवा मग रेल्वे स्टेशनवर शाहरुखचा ‘पलट’वाला डायलॉग असतो. हे डायलॉग इतके गाजले की, अनेक तरुण मुलं नेहमी मुलींना बोलताना दिसली होती. किंबहुना आजही पाहायला मिळतात.

चित्रपटातील सर्वच गाणे इतके मेलोडियस आहेत की, आजही प्रेक्षक ही गाणी आवडीने ऐकतात. विशेष म्हणजे, ‘मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना’ या गाण्याशिवाय तर कदाचित कोणत्याही मुलीच्या लग्नावर मेहंदीचा कार्यक्रम अपूर्णच वाटतो. जतिन- ललित आणि आनंद बख्शी यांचे लिरिक्स जेव्हा लता मंगेशकर, आशा भोसले, उदित नारायण, कुमार सानू आणि अमिताभ भट्टाचार्य यांचा आवाज एकत्र आला, तेव्हा इतिहासच रचला गेला. सर्व गाण्यांना चित्रपटात शानदार पद्धतीने चित्रीत करण्यात आले होते.

चित्रपटाची मुख्य अभिनेत्री काजोलने चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनचा सीन आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

आज चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण झाली असली, तरीही आजही या चित्रपटाचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मुंबईच्या मराठा मंदिर टॉकीजमध्ये हा चित्रपट तब्बल १ हजार आठवडे चालला होता. हा विक्रम यापूर्वी ‘शोले’ चित्रपटाच्या नावावर होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आक्षेपार्ह भाष्य केल्यामुळे अटक झालेली अभिनेत्री युविका चौधरी नक्की आहे तरी कोण?

-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

-क्या अंदाज हैं! रोहनप्रीतच्या गळ्यावर चाकू ठेऊन नेहा कक्करने हटके अंदाजात केले प्री एनिवर्सरी सेलिब्रेशन

हे देखील वाचा