आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड

काही वेळापूर्वीच अं’मली पदार्थ प्रकरणात तुरुंगात बंद असलेला मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी, अभिनेता शाहरुख खान मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. शाहरुख पहिल्यांदाच त्याच्या मुलाला भेटायला तुरुंगात गेला होता. मुलाला भेटल्यानंतर शाहरुख खान १५ मिनिटे त्याच्याशी बोलला. तसेच तुरुंगातून बाहेर येताना अभिनेत्याने मीडियाशी बोलणे टाळले.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने धाड टाकली. तिच्या वांद्रे स्थित घरावर छापा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर त्यानंतर आता एनसीबीची टीम शाहरुख खानच्या घरी पोहोचली आहे. (ncb team at shah rukh khan house mannat in mumbai)

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकतेच एनसीबीचे अधिकारी शाहरुख खानच्या घरी पोहोचले आहेत. आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबी मन्नतवर जाऊन शोध घेईल, असे म्हटले जात होते. आता एनसीबीची टीम शाहरुखच्या घरी पोहोचली आहे आणि घरामध्ये शोधकार्य सुरू केले आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आर्यन खान प्रकरणात जामिनाला सातत्याने विरोध करत आहे. एनसीबीचे सर्व युक्तिवाद प्रामुख्याने व्हॉट्सअॅप चॅटवर आधारित आहेत. आता त्याच्या वकिलाने आर्यनच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

-‘हाय प्रोफाइल असण्याची किंमत मोजावी लागते’, म्हणत जावेद अख्तर यांनी व्यक्त केली आर्यनची चिंता

-‘या’ कारणामुळे शाहरुखने आपल्या लाडक्याचे नाव ठेवले होते ‘आर्यन’, मुलीशी आहे कनेक्शन

Latest Post