Tuesday, June 25, 2024

‘या’ मोठ्या कलाकारांनी मुलांना दत्तक घेत ठेवला समाजापुढे आदर्श

बॉलिवूडमध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला नवनवीन काहीतरी पाहायला मिळते. आपण नेहमीच पाहिले आहे, की बॉलिवूड कलाकारांचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण केले जाते. अशा वेळेस जेव्हा कलाकार एखादी चांगली गोष्ट करतात तेव्हा अनेक लोकं त्यांना फॉलो करतात. आपण नेहमीच कलाकारांबद्दल खूप चुकीच्या समजुती घेऊन चालत असतो, मात्र या समजुती सर्वच कलाकारांना लागू होतात असे नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्रवाहापेक्षा वेगळे काम करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. बॉलिवूडमध्ये पाहिले तर आपल्याला अनेक कुटुंब असे दिसतील ज्यांनी अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे. अनेक मोठमोठ्या कलाकारांनी त्यांच्या मुलांना दत्तक घेत त्यांच्यात असणाऱ्या एका सर्जनशील आणि जिवंत माणुसकीचे दर्शन दिले आहे. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही कलाकारांची नावे, ज्यांनी त्यांच्या मुलांना दत्तक घेतले आहे.

प्रीती झिंटा :
अभिनेत्री प्रीती झिंटाने ऋषिकेशमधील ३४ अनाथ मुलींना दत्तक घेतले आहे. प्रत्येक वर्षात कमीत कमी दोनदा तरी प्रीती या मुलींना भेटायला जात असते. नुकतीच प्रीती दोन जुडवा मुलांची आई झाली आहे. त्यांचे नाव तिने जिया आणि जय ठेवले आहे.

रवीना टंडन :
रवीनाने वयाच्या २१ व्या वर्षी छाया आणि पूजाला दत्तक घेत सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. तिने ११ आणि ८ वर्षाच्या मुलींना दत्तक घेतले होते. एवढ्या कमी वयात करिअरसोबत या मुलींकडे लक्ष देणे तिच्यासाठी जरी आव्हानात्मक असले तरी तिने तिची ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडली. रवीना नेहमीच सांगायची की, तिला या दोघींसोबत राहत असताना तिला आई पेक्षा जास्त बहिणीसोबत राहत असलयाचे वाटायचे. २००४ साली रवीनाने अनिल थडानीसोबत लग्न केले. लग्नानंतर ती याशा आणि रणवीरवर्धन या दोघांची आई झाली.

सुश्मिता सेन :
मिस युनिव्हर्स राहिलेल्या अभिनेत्री सुश्मिता सेनने देखील दोन मुलींना दत्तक घेतले आहे. सुश्मिताने वयाच्या २५ वर्षी रैना आणि २०१० साली अलीशाला दत्तक घेतले. करिअरच्या पीक पॉईन्टवर असताना तिने रैनाला दत्तक घेतले. सुश्मिता दोन मुलींची आई असून हे ती अभिमानाने सर्वांना सांगते.

सनी लियोनी :
जुलै २०१७ साली सनीने आणि तिच्या नवऱ्याने डेनियलने महाराष्ट्रातील लातूरमधून निशा कौर नावाच्या मुलीला दत्तक घेतले. त्यानंतर तिने अशर आणि नोह या मुलांचा सरोगसीचा माध्यमातून जन्म झाला.

मंदिरा बेदी :
मंदिराने मागच्यावर्षी खुलासा केला की तिने पाच वर्षाच्या मुलीला दत्तक घेत तिचे नाव तारा ठेवले.

साक्षी तंवर :
टीव्ही क्षेत्रातील आणि बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री असलेल्या साक्षी तंवरने २०१८ साली एका मुलीला दत्तक घेतले. साक्षीने ९ महिन्याच्या मुलीला दत्तक घेत तिचे नाव तिने दित्या ठेवले आहे. साक्षी एक सिंगल आई असून, तिने अजून लग्न केलेले नाही.

सलीम खान :
सलीम खान आणि हेलन यांनी १९८१ साली लग्न केले. लग्नानंतर त्यांना अपत्य न झाल्याने त्यांनी अर्पिता नावाच्या एका मुलीला दत्तक घेतले. अर्पिता खान कुटुंबातील सर्वात लाडकी मुलगी आहे.

मिथुन चक्रवर्ती :
मिथुन चक्रवर्ती यांनी दिशानी नावाच्या मुलीला दत्तक घेतले आहे. दिशानी मिथुन यांना कचऱ्याच्या पेटीत सापडली होती. तिला बघताच त्यांनी तिला दत्तक घ्यायचे ठरवले या निर्णयात त्यांच्या पत्नीने त्यांना पूर्ण साथ दिली.

सुभाष घई :
शोमॅन सुभाष घई आणि त्यांची पत्नी असलेल्या मुक्त घई यांनी मेघना नावाच्या मुलीला दत्तक घेतले. लग्नाच्या २७ वर्षानंतर त्यांना मुस्कान नावाची मुलगी झाली.

निखिल अडवाणी :
‘कल हो न हो’, ‘सलामे इश्‍क’, ‘डी-डे’ अशा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या निखिल अडवाणी आणि त्यांच्या पत्नी सुपर्णा यांनी चार वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले आहे.

 

कुणाल कोहली :
चित्रपट समीक्षण, दिग्दर्शक, निर्माता असणाऱ्या कुणाल कोहलीने रवीना कोहलीसोबत लग्न केले. त्यानंतर त्यांनी मुलगी राधा कोहलीला दत्तक घेतले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा