मनोरंजनविश्वातील ‘या’ कलाकारांनी केले आहे आपल्या जोडीदाराला सार्वजनिक ठिकाणी किस


कलाकार नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या फॅन्सला देखील त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्साह असतो. बरेच कलाकार देखील अनेकदा त्यांचे वैयक्तिक आयुष्य फॅन्ससमोर, मीडियासमोर आणायला काचकूच करत नाही. ते बिनधास्तपणे त्यांचे वैयक्तिक आयुष्य मीडियासमोर आणतात. कधी कधी तर हेच कलाकार त्यांच्या जोडीदारांसोबतचे काही खासगी आणि खास क्षण देखील सर्वांसोबत शेअर करतात. बऱ्याचदा कलाकार त्यांच्या जोडीदाराला सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसतात. तर काही कलाकार त्यांचे किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील करतात. या लेखातून अशाच काही कलाकारांची नावे जाणून घेणार आहोत.

राणा डग्गुबत्ती आणि मिहिका बजाज :
काही महिन्यांपूर्वीच बाहुबली फेम राणा डग्गुबत्तीने त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत लग्न केले. नुकताच राणाने त्याच्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राणा मिहिकाला लग्न मंडपात किस करताना दिसत आहे.

आमिर खान आणि किरण राव :
नुकताच घटस्फोट घेतलेले बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल असणारे आमिर खान आणि किरण राव यांना देखील अनेकदा सार्वजनिक ठिकाणी किस करताना पाहिले गेले.

बिपाशा बसू आणि करणसिंग ग्रोव्हर :
बिपाशा बसू आणि करणसिंग ग्रोव्हर बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणून ओळखले जाते. बिपाशा आणि करण नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे हॉट आणि मादक फोटो शेअर करताना दिसतात. यात अनेकदा ते एकमेकांना किस करताना दिसतात.

काम्या पंजाबी आणि शलभ डांग :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील हॉट कपल म्हणून काम्या पंजाबी आणि शलभ डांगला ओळखले जाते. काम्या टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध खलनायिका म्हणून ओळखली जाते. काम्याने साधारणपणे वर्षभरापूर्वी दिल्लीमधील डॉक्टर असलेला शलभ डांगसोबत लग्न केले. या दोघांच्या लग्नाच्या रिसेप्शनला काम्या आणि शलभ एकमेकांना किस करताना दिसले.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास :
बॉलिवूडमधील देसी गर्ल असणाऱ्या प्रियंकाने हॉलीवूडचा सुपरस्टार आणि प्रसिद्ध गायक असणाऱ्या निक जोनाससोबत लग्न केले. प्रियांका आणि निक अनेकदा एकमेकांना किस करताना दिसतात दिसतात. त्यांचे किस करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

सनाया इराणी आणि मोहित सेहगल :
मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री बबली गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनाया इराणीने तिच्या नवऱ्याला किस करतानाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तो थोड्या वेळातच व्हायरल झाला होता.

श्वेता साळवे आणि हरमीत सेठी :
टेलिव्हिजन अभिनेत्री असणाऱ्या श्वेता साळवेने देखील तिच्या नवऱ्याला हरमीतला किस करतानाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

सनी लियोनी डेनियल वेबर :
बेबी डॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनी लियोनीने देखील तिच्या नवऱ्याला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी किस केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…


Latest Post

error: Content is protected !!