नकारांचे डोंगर पार करत जिद्दीच्या जोरावर बॉलीवूडवर राज्य करणारे पाच कलाकार


बॉलिवूडमध्ये तुमचे नशीब हा येणारा प्रत्येक शुक्रवार ठरवत असतो. एका सिनेमात तुम्ही रंकापासून राजा होतात तर दुसऱ्याच सिनेमात रंकापासून राजा. अशी बेभरवशाची दुनिया म्हणजे बॉलिवूड. बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच तुमचं दिसणं देखील तितकेच महत्वाचे असते. पूर्वीच्या काळी कलाकरांना अभिनय येणे त्याच्या प्रतिभा असणं महत्वाचे होते. मात्र काळ बदलला लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आता अभिनयासोबतच तुमचा चेहरा देखील महत्वाचे ठरू लागले. जाड, चांगले न दिसणारे अनेक कलाकार हळू हळू बॉलिवूडमधून बाहेर जाऊ लागले. मात्र असे देखील अनेक कलाकार आहेत ज्यांना सुरुवातीला त्यांच्यातल्या काही कमतरतेमुळे खूप नकार ऐकावे लागले, परंतु आज तेच कलाकार संपूर्ण बॉलिवूडवर आणि प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवत आहेत. आज आपण अशाच काही कलाकारांची नावे बघणार आहोत.

गोविंदा :
ची ची म्हणून ओळखला जाणारा गोविंदा आज भलेही जास्त चित्रपटांमध्ये दिसत नसला तरी गोविंदाने त्यांच्या अभिनयामुळे,विनोदी संवाद फेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे आणि डान्समुळे एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले होते.
हिरो नं १, कुली नं १, साजन चाले ससुराल, हसीना मान जायेगी, बडे मिया छोटे मिया, पार्टनर, आँखे अशा अनेक चित्रपटांमध्ये गोविंदाने एक से बढकर एक भूमिका साकारल्या. पण तुम्हाला माहित आहे याच गोविंदाला अतिजास्त तरुण दिसण्यामुळे सुरुवातीच्या अनेक काळात चित्रपटांमध्ये नाकारण्यात आले होते.

धनुष :
बॉलिवूड सोबतच साऊथ सिनेसृष्टीवर आपल्या जीवनात अभिनयाची छाप सोडणार हा अभिनेता देखील सुरुवातीला खूप नाकारला गेला. ‘हिरो’ या संकल्पनेत त्याचे दिसणे बसत नसल्याने धनुषला अनेक नकार पचवावे लागले. मात्र त्याने त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर आज संपूर्ण साऊथ चित्रपटसृष्टी सोबत बॉलिवूडमध्ये देखील वेगळी ओळख तयार केली आहे. धनुषच पहिलाच बॉलिवूड चित्रपट ‘रांझना’ने त्याला बॉलिवूडमध्ये हिरोचा दर्जा मिळवून दिला.

अजय देवगण :
बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अजय भलेही आज त्याच्या अभिनयाने आणि ऍक्शनने लोकांच्या हृदयावर राज्य करत असला तरी सुरुवातीच्या काळात अजयला तिच्या स्किन कॉम्पलेक्शनमुळे खूप नकार मिळाला. मात्र त्याने जिद्द्दीने काम केल्याने आज तो बॉलिवूड गाजवत आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकी :
आज नवाजुद्दीनला कोणत्याही ओळखीची गरज राहिली नसली तरी त्याला देखील सुरुवातीच्या काळात कमी उंचीमुळे आणि आणि त्याच्या दिसण्यामुळे खूप नकार मिळाले हते. नवाजुद्दीनला सर्वात पहिल्यांदा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मध्ये चोराचा एक छोटासा रोल मिळाला होता.

इरफान खान:
बॉलिवूडसोबतच हॉलिवूड गाजवणारा हा कलाकार आज जरी आपल्यात नसला तरी त्याने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतः अढळ स्थान निर्माण केले आहे. पान सिंह तोमर, द लंच बॉक्स, पीकू आदी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुरुवातीला इरफानला देखील त्याच्या दिसण्यामुळे अनेक वेळा नकार मिळाले होते.

अमिताभ बच्चन :
आज जरी अमिताभ बच्चन हे महानायक म्हणून ओळखले जात असले तरी एक वेळ अशी होती की त्यांना त्यांच्या जड आवाजामुळे, उंचीमुळे आणि त्यांच्या लूक्समुळे नकार मिळाले होते. आठ वर्ष त्यांना काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.


Leave A Reply

Your email address will not be published.