चित्रपटाची शूटिंग करतानाच खऱ्या आयुष्यात ‘हे’ सेलिब्रिटी अडकले होते प्रेमाच्या जाळ्यात, वाचा त्यांची ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’

These Six Famous Celebs Fell In Love With Co Star During Shooting

बॉलिवूडमधल्या अशा अनेक जोड्या आहेत. ज्यांनी पडद्यावर अनेक रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. तसेच भूमिका साकारताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अगदी विवाह बंधनात देखील अडकले आहेत. चला तर जाऊन घेऊयात बॉलिवूडमधल्या अश्याच काही जोडप्यांबद्दल.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग
बॉलिवूड अभिनेत्री ‘दीपिका पादुकोण’ आणि ‘रणवीर सिंग’ यांनी आतापर्यंत 3 चित्रपट एकत्र केले आहेत. दोघांनी एकत्र केलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘गोलियों की रासलीला: रामलीला’. या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान ते दोघेही एकमेकांच्या जवळ आले. रणवीर आणि दीपिका हे दोघे जवळपास 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. परंतु त्यांनी त्यांचं नावं सर्वत्र पसरू दिलं नाही. एकमेकांना चांगलं समजून घेतल्यावर दीपिका आणि रणवीरने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजही रणवीर दिग्दर्शक ‘संजय लीला भन्साळी’ यांचे आभार मानतो. तो असे म्हणतो की, संजय यांच्यामुळे मला दीपिका भेटली.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं नावं देखील या यादीत येतं. यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचे झाल्यास, एका जाहिरातीच्या शूटिंगच्या दरम्यान अनुष्का आणि विराट एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर त्यांची ओळख झाली. गप्पा वाढू लागल्या. हळूहळू दोघेही प्रेमाच्या जाळ्यात अडकले. हे दोघे बरेच वर्ष एकमेकांना डेट करत होते. मग पुढे जाऊन त्यांनी 2017 मध्ये लग्न केले. नुकतेच विराट आणि अनुष्का यांना मुलगी झाली आहे. त्यांनी तिचे‌ नाव त्यांनी‌ वामिका असं ठेवलं आहे. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रक्षकांसोबत नेहमीच काही ना काही शेअर करत असतात.

करीना कपूर खान आणि सैफ अली खान
अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली. ‘टशन’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी ‘कुर्बान’ या चित्रपटात सोबत काम केले. 2012 मध्ये करीनाने तिच्या पेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या सैफ अली खानसोबत लग्न केले. या दोघांना तैमूर नावाचा एक मुलगा देखील आहे. तसेच करीना आणि सैफ हे लवकरच दुसऱ्यांदा आई- बाबा होणार आहेत, अशी बातमी देखील हाती आली आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लव्ह स्टोरीची सर्वात देखील चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली. 2016 मध्ये  ‘गुरु’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं. तिथूनच त्यांचा लव्हस्टोरीला सुरुवात झाली. 2007 मध्ये ते लग्नाच्या बंधनात अडकले. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी ‘रावण’, ‘उमराव जान’ आणि ‘धूम 2’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. या दोघांना एक मुलगी आहे. आणि तीचं नाव आराध्या हे आहे.

काजोल आणि अजय देवगण
अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. 1995 मध्ये ‘हलचल’ या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा सोबत काम केले. त्यानंतर त्यांनी ‘इश्क’ या चित्रपटात एकत्र काम केले आणि तिथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. त्यांनी 1999 मध्ये लग्न केले. अजय आणि काजोल यांना दोन मुले आहेत. ज्यांची नावं नायसा आणि युग हे आहे.

जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख
जेनेलिया आणि रितेश यांची प्रेम कहाणी खूप मजेशीर आहे. यांनी ‘तेरी मेरी कसम’ या चित्रपटात एकत्र काम केले. आणि तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु त्या दोघांनी कधीही सगळ्यांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही.

त्यांनी एका मुलाखतीमध्ये असे सांगितले की, ते फिरायला देखील कुठेतरी लांब जायचे. जेणेकरून त्यांना कोणी पाहू नये. पुढे जाऊन 2012 मध्ये रितेश आणि जेनेलिया यांनी लग्न केले.

हेही वाचा-

प्रपोज करायचंय? मग बॉलिवूड कलाकारांनी केलेल्या ‘या’ आयडिया एकदा वापरून तर पाहा

राकेश रोशनपासून ते सोनाली बेंद्रेपर्यंत कँसरचा सामना करणारे सेलिब्रिटी; ‘या’ कलाकारांना गमवावा लागला जीव

Leave A Reply

Your email address will not be published.