प्रपोज करायचंय? मग बॉलिवूड कलाकारांनी केलेल्या ‘या’ आयडिया एकदा वापरून तर पाहा

2021 Propose Day Priyanka To Kareena Saif This Is How Celebs Propose Their Partner In Romantic Style


नुकतीच प्रेमाच्या आठवड्याला म्हणजेच व्हॅलेंटाईन आठवड्याला सुरुवात झाली आहे. आज (८ फेब्रुवारी) ‘प्रपोज डे’ आहे. हा दिवस प्रत्येक प्रियकर आणि त्याच्या प्रेयसीसाठी खूप खास असतो. आजच्याच दिवशी ते प्रेम व्यक्त करण्याच्या खास योजना आखत असतात. आज आपण या लेखातून बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडींच्या प्रपोजल स्टोरीबद्दल सांगणार आहोत. हे वाचून तुम्हालाही तुमच्या प्रियकर- प्रेयसीला प्रपोज करण्याची आयडिया येईल.

१. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची जोडी बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे. ही जोडी जितकी सुंदर आहे, तितकीच सुंदर या जोडीची प्रपोजल स्टोरी आहे. निक जोनास प्रियांकाला तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ग्रीकच्या एका आयलँडवर घेऊन गेला होता. तिथे त्याने प्रियांकाला एकदम हटके अंदाजात प्रपोज केले होते.

निक गुडघ्यावर बसला होता आणि त्याने प्रियांकाला म्हटले होते की, “तू जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस. त्यामुळे तू माझ्याशी लग्न करून मला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवशील का?” यानंतर प्रियांकाने काय उत्तर दिलं असेल, हे तर तुम्हाला माहितंच असेल. सध्या प्रियांका निकसोबत अमेरिकेत स्थायिक झाली आहे.

२. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला आता १४ वर्षे उलटून गेली आहेत. परंतु आजही ही जोडी बॉलिवूडच्या सर्वोत्तम जोडींपैकी एक आहे. प्रत्येकाला असे वाटत असेल की, अभिषेकसारख्या मोठ्या स्टारने ऐश्वर्याला भन्नाट पद्धतीने प्रपोज केले असेल. परंतु असे काही नाही झाले.

अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, “आम्ही न्यूयॉर्कमध्ये ‘गुरू’ चित्रपटाची शूटिंग करत होतो. मी एके दिवशी हॉटेल रूमच्या मोठ्या खोलीत उभा होतो आणि विचार करत होतो की, जेव्हा आम्ही दोघेही लग्न करून सोबत असू, तेव्हा तो दिवस किती चांगला असेल. त्यानंतर आम्ही वर्षभर गुरू प्रीमियरसाठी तिथे गेलो. प्रीमियरनंंतर आम्ही पुन्हा त्याच हॉटेलमध्ये गेलो आणि त्याच बालकनीत मी ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले.”

३. करीना कपूर आणि सैफ अली खान
नवाब सैफ अली खान याने करीना कपूरला २ वेळा प्रपोज केले होते, ही गोष्ट खूप कमी चाहत्यांना माहिती असेल. विशेष म्हणजे दोन्ही वेळा त्याने पॅरिसमध्येच करीनाला प्रपोज केले होते. पहिल्यांदा सैफने पॅरिसच्या रिट्स हॉटेलमध्ये करीनाला प्रपोज केले होते. परंतु करीनाने त्याचे प्रपोजल नाकारले. त्यानंतर मात्र दुसऱ्यांदा सैफने करीनाला त्याच जागेवर प्रपोज केले, जिथे त्याचे वडील मंसूर अली खान पतौडी यांनी सैफची आई शर्मिला यांना प्रपोज केले होते.

४. आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप
अभिनेता आयुषमान खुराना आणि दिग्दर्शिका ताहिरा कश्यप यांनी खूप वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले होते. दोघेही कॉलेज वयापासून एकमेकांवर प्रेम करत होते. आयुषमान हा लाजाळू स्वभावाचा होता. परंतु तरीही त्याने ताहिराला कँडल लाईट डिनर डेटवर नेत प्रपोज केले होते.

५. बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवरची भेट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. दोघेही थायलंडला सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. तिथे ३१ डिसेंबरला करणने बिपाशाला अंगठी देऊन प्रपोज केले होते.

करण तब्बल १० मिनिटे गुडघ्यावर बसला होता त्यावेळी बिपाशा म्हणाली होती, ‘काय झालंय तुला? तुला माझ्याशी लग्न का करायचे आहे?’ त्यानंतर शेवटी बिपाशाने करणचे प्रपोजल स्वीकारले होते.

हेही वाचा-

हॅप्पी रोझ डे: ‘फूल गुलाब का’ पासून ते ‘आओगे तुम जब वो साजना’,चला ऐकुयात काही सदाबहार गाणी


Leave A Reply

Your email address will not be published.