×

Video : स्वत:च्याच वरातीत नवरी अप्पूचा ‘हृदयी वसंत फुलताना’ गाण्यावर भन्नाट डान्स, कुक्की गँगचीही साथ

स्टार प्रवाहावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेची कहाणी आणि पात्र काही वेगळी असल्याने प्रेक्षकांना देखील मालिका पाहायला बोर होत नाही. मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी ज्ञानदा रामतीर्थकर तिच्या गोड स्वभावाने अल्पावधीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. प्रत्येकवेळी अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत असणारी नायिका ही खूपच सोज्वळ आणि त्यागी दाखवली जाते. परंतु या मालिकेतील अप्पूचे नटखट आणि बिनधास्त पात्र सगळ्यांना आवडत आहे. अशातच मालिकेत सध्या अप्पू आणि शशांकच्या लग्नाचा ट्रॅक चालू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील त्यांचे हे लग्न बघताना खूप आनंद होत आहे.

अप्पू आणि शशांकचे लग्न अगदी थाटात पार पडत आहे. अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या लग्नातील समारंभांना हजेरी लावली आहे. अशातच त्यांच्या लग्नाचा एपिसोड टेलिकास्ट केला जाणार आहे. या एपिसोडमध्ये आपल्याला अप्पू आणि शशांकच्या कुटुंबातील सगळे डान्स करताना दिसणार आहेत. याचाच एक प्रोमो स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून समोर आला आहे. (thipkyanchi rangoli serial wedding track are going appu and shashank dance video viral)

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, हा प्रोमो पाहून आपल्याला एका सदाबहार गाण्याची आठवण नक्कीच होईल. या प्रोमोमध्ये सगळेजण ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अप्पू देखील अगदी दिलखुलासपणे तिच्या लग्नात डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या लग्नातील हा खास क्षण सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्यामुळे हा एपिसोड बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.

ज्ञानदा रामतीर्थकरसोबत या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे मुख्य भूमिकेत आहे. ज्ञानदाने याआधी ‘सख्या रे’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत सुयश टिळक मुख्य भूमिकेत होता.

हेही वाचा :

Latest Post