Sunday, July 14, 2024

‘तारक मेहता…’मधील जुन्या ‘अंजली भाभी’चे असे झालेत हाल, व्हिडिओ पाहून तुमचीही उडेल झोप

टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ ही प्रसिद्ध मालिका गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. जेव्हापासून या शोच्या निर्मात्यांनी ‘दयाबेन’ या शोमध्ये परतण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अशा परिस्थितीत आता शोमधील जुनी ‘अंजली भाभी’ म्हणजेच अभिनेत्री नेहा मेहता हिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेमध्ये शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहता (Neha Mehta) हिने 2020 साली शो सोडला होता. मात्र, गेल्या 2 वर्षांत नेहा कुठेच दिसली नाही. यासोबतच ती सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असल्याच बघायला मिळते. मात्र, गणेश पूजेच्या खास प्रसंगी अभिनेत्रीने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती गणपती हातात धरून प्रथम विना मेकअपची आणि नंतर मेकअप करताना दिसत आहे. यावेळी तिचा लूक बदलल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत नेहाने लिहिले की, “सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Mehta (@mehta.neha.sk)

तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने लिहिले की, “तुम्ही तारक मेहता शोमध्ये परत या.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “मराठी मुलगी.” आणखी एकाने लिहिले की, “तुम्ही तारक मेहता का उल्टा चष्मा शोमध्ये परत आलं पाहिजे.”

नेहा मेहताने जवळपास 12 वर्षे या शोमध्ये तारक मेहता यांच्या पत्नी अंजली मेहताची भूमिका साकारली होती. पण तिने 2020 मध्ये शोला अलविदा केलं आणि त्याची जागा सुनैना फौजदारने घेतली. अलीकडे, नेहा चर्चेत आली होती जेव्हा नेहा मेहताने शोच्या निर्मात्यांवर उर्वरित मानधन न केल्याचा आरोप केला होता. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील त्याच्या कामाच्या 6 महिन्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, असे तिने एका मुलाखतीत सांगितले. यासोबतच आपल्या कष्टाची कमाई नक्कीच मिळेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला हाेता.

तब्बल 12 वर्षे या मालिकेचा भाग बनल्यानंतर मध्येच माशी शिंकली. कोरोना दरम्यान, तिचे निर्माते असित मोदी यांच्याशी काही गोष्टीवरून मतभेद झाले. त्यानंतर मात्र ती पुन्हा शोमध्ये परतली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोप्पा नाहीये सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा सिनेप्रवास; वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी दिले होते ऑडिशन
बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्रीने वाढवला इंटरनेटचा पारा, ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांनाही घातली भुरळ
साऊथच्या अभिनेत्रीने निर्मात्याशी थाटला संसार; नवरदेवाला पाहताच नेटकरीही म्हणाले, ‘हे कसं शक्य?’

हे देखील वाचा