Sunday, December 8, 2024
Home हॉलीवूड धक्कादायक! ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकावर मोठा आरोप, काम देण्याच्या बदल्यात ‘या’ अभिनेत्याचा लैंगिक छळ

धक्कादायक! ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकावर मोठा आरोप, काम देण्याच्या बदल्यात ‘या’ अभिनेत्याचा लैंगिक छळ

कास्टिंग काऊच हा शब्द बॉलिवूडची आणि भारतीय प्रेक्षकांसाठी आता काही नवीन नाही. अनेकदा किंबहुना नेहमीच आपण लहान मोठ्या अनेक कलाकारांचे कास्टिंग काऊचबद्दलचे धक्कदायक खुलासे ऐकत असतो. या कास्टिंग काऊचला पुरुष स्त्री असा कोणताच भेद नाही. हे कास्टिंग काऊच फक्त बॉलिवूड किंवा भारतीय मनोरंजनविश्वात नाही तर जगातील सर्वच ठिकाणी होते. संपूर्ण जगात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणाऱ्या हॉलिवूडमध्ये देखील अनेक मोठमोठ्या कलाकारांनी याचा अनुभव घेतला आहे. यातच आता एका लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्याने त्याचा कास्टिंग काऊच अनुभव सांगितला आहे. त्याच्या या खुलाशामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे.

अमेरिकन अभिनेता मॅथ्यू लॉरेन्स हा सध्या खूपच चर्चेत आला आहे. ‘बॉय मीट्स वर्ल्ड’ या लोकप्रिय सिटकॉम शोमध्ये त्याने काम केले होते. मात्र सध्या तो त्याच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाच्या खुलाशामुळे गाजत आहे. मॅथ्यूने एका ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकावर लैंगिक छळ केल्याचा मोठा आणि सणसणीत खेज आरोप केला आहे. शिवाय संपूर्ण जगात गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या मार्वल कॉमिक चित्रपटांच्या सीरिजमध्ये काम देण्याच्या बदल्यात त्या दिग्दर्शकाने त्याच्याकडे कपडे काढून नाचण्याची अर्थात स्ट्रिपिंगची मागणी केल्याचे देखील त्याने सांगितले आहे.

मॅथ्यू लॉरेन्सने त्याच्या स्वतःचे पॉडकास्ट असलेल्या ‘ब्रदरली लव्ह’मध्ये याचा धक्कदायक खुलासा केला आहे. त्याने अमेरिकेत सुरु असणाऱ्या ‘मीटू’ चळवळीला पाठिंबा देताना त्याचा हा विदारक अनुभव सांगितला आहे. यासोबतच त्याने अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे यात पुरूषांसोबतच महिलांचाही समावेश आहे. मॅथ्यूने त्या दिग्दर्शकाच्या मागणीला विरोध केल्यामुळे त्याला त्याच्या एजन्सितूनही बाहेर काढण्यात आले होते.

या खुलाशामध्ये मॅथ्यूने कुठेही कोणत्याही दिग्दर्शकाचे नाव, इतर माहिती किंवा हिंट दिलेली नाही. त्याने फक्त हेच सांगितले की, त्याला एका हॉटेल रूममध्ये बोलावत मार्वलच्या आगामी चित्रपटात एक प्रमुख भूमिका ऑफर केली. मात्र त्याबदल्यात मॅथ्यूकडे कपडे काढण्याची मागणी केली होती. त्यासोबतच त्याने अशा प्रकारच्या घटना अनेक लोकांसोबत घडल्याचे देखील सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा