Thursday, April 18, 2024

हॉलीवूडस्टार टॉम क्रूझच्या घरापासून प्रेरित आहे ‘या’ सुपरस्टारचे कोट्यवधींचे घर, जाणून घ्या त्याच्या संपत्तीविषयी

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील मोठे नाव म्हणून थलपति विजयला ओळखले जाते. त्याने त्याच्या चित्रपटांमधून त्याची पॅन इंडिया ओळख निर्माण केली आहे. आज थलपति विजय हे नाव देशातील किंबहुना जगातील कोणत्याही व्यक्तीला अनोळखी नाही. त्याच्या चित्रपटांची नेहमीच आतुरतेने वाट पाहिली जाते. आपल्या कामातून प्रेक्षकांची मने जिंकणारा विजय टॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत देखील टॉपवर आहे. चला जाणून घेऊया थलपति विजयच्या एकुण नेटवर्थबद्दल.

थलपति विजयच्या कमाईचे मुख्य साधन चित्रपट आहेत. थलपति विजय आपल्या प्रत्येक सिनेमासाठी मोठी रक्कम घेतो. एका रिपोर्टनुसार थलपति विजयने नेल्सन दिलीपकुमार यांच्या ‘बीस्ट’ सिनेमासाठी १०० कोटी रुपये घेतले होते. यासोबतच तो मोठमोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी बक्कळ रक्कम घेतो. एका जाहिरातीसाठी तो १० कोटींची फी घेतो. विजय तब्बल 445 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

Thalapathy-Vijay
Photo Courtesy: social media

यासोबतच थलपति विजयकडे चेन्नईच्या नीलांकराई जवळ कैसुरिना ड्राइव स्ट्रीट रोडवर स्वतःचा आलिशान बंगला आहे. तो त्याच्या कुटुंबासोबत अतिशय आलिशान लक्झरी जीवन जगतो. एका माहितीनुसार त्याचे घर हे हॉलीवूडस्टार टॉम क्रूझच्या घरापासून बऱ्याचअंशी प्रेरित आहे. या घरची किंमत देखील कोट्यवधी आहे.

या शानदार घरासोबतच थलपति विजयकडे अतिशय महागड्या आणि आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्या या कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू एक्स5 एंड एक्स6, ऑडी ए8 एल, फोर्ड मुस्टैग, वॉल्वो एक्ससी90, मर्सीडीज बेंज जीएलए, लैंड रोवर आदी गाड्यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“ती चित्रपटात येते नाचते, मार खाऊन…” कंगना रणौतबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ‘या’ अभिनेत्याचे उत्तर आले चर्चेत

उत्कृष्ट अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून ओळख मिळवणारी श्रिया पिळगावकर आहे ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेत्री

हे देखील वाचा