×

माधुरी दीक्षितमुळे दिल तो पागल है सिनेमाची ऑफर ‘या’ अभिनेत्रीने नाकारली होती, जाणून घ्या पूर्ण किस्सा

मधल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये दोन अभिनेत्रींमध्ये अनेकदा कॅटफाईट्च्या बातम्या आपण ऐकल्या असतील. इंडस्ट्रीमध्ये ‘कॅटफाइट’ हा शब्द आताच्या काळात अतिशय सामान्य असला तरी तो बराच जुना आहे. काही कालावधीपासून आपण सतत कॅटफाइटबद्दल ऐकतो, वाचतो, पाहतो. मात्र आताच्या अभिनेत्रींमध्ये होणारी कॅटफाइट जरी सामान्य असली तरी पूर्वीच्या काळातही दोन अभिनेत्रींमध्ये भांडणं व्हायची. यांची अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. मात्र अभिनेत्रींसाठी कॅटफाइट ही त्यांच्या फायद्यापेक्षाही अधिक महत्वाची असायची. कारण या कॅटफाइटमुळे अनेक अभिनेत्रींना नुकसान देखील सहन करावे लागले आहे. आज आपण अशाच एका कॅटफाइटबद्दल जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडमधले ९० चे दशक गाजले तर रोमॅंटिक चित्रपट आणि गाण्यांसाठी. अनेक रोमॅंटिक चित्रपटांनी या दशकात प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. मात्र हे दशक अजून एका गोष्टीसाठी देखील खूप गाजले आणि ती गोष्ट म्हणजे अभिनेत्रींमधील भांडणं अर्थात कॅटफाइट. याच दशकात एक कॅटफाइट खूपच गाजली आणि ती म्हणजे जुही चावला आणि माधुरी दीक्षित यांच्यातली. यश चोप्रा यांचा सुपरहिट सिनेमा ‘दिल तो पागल हैं’ जुहीला ऑफर झाला होता, केवळ माधुरी दीक्षितमुळे तिने हा सिनेमा नाकारला.

View this post on Instagram

A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

एका मुलाखतीदरम्यान खुद्द जुही चावलाने याबाबत खुलासा केला होता. तिने सांगितले होते की तिला दिल तो पागल है सिनेमा ऑफर झाला होता. तिला करिश्मा कपूरने साकारलेला रोल ऑफर केला गेला होता. मात्र जेव्हा तिला समजले की, तिला सेकंड लीड रोल ऑफर झाला आहे, आणि मुख्य लीडमध्ये माधुरी दीक्षित आहे, तेव्हा ती या चित्रपटाला नकार दिला. नंतर हा रोल करिश्माकडे गेला आणि तिने या भूमिकेचे सोने केले. करिश्माला त्या भूमिकेसाठी फिल्मफेयर पुरस्कार देखील दिला गेला होता.

या ९० च्या माधुरी आणि जुही यांच्यात असणारी कॅटफाईट्च्या तुफान चर्चा रंगल्या. दोघी एकमेकींसोबत जास्त बोलत देखील नव्हत्या. मात्र काहीवर्षांनी त्यांनी २०१४ साली ‘गुलाब गॅंग’ या सिनेमात सोबत काम केले. रिपोर्टनुसार या सिनेमाच्या सेटवरही त्या जास्त बोलत नव्हत्या. मात्र एकदा त्यांना एका खोलीत बंद केले आणि मग खोली उघडली तेव्हा त्या एकमेकींसोबत चांगल्या पद्धतीने बोलताना दिसल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post