‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या माध्यमातून ‘ही’ बॉलिवूड दिवा करणारा मराठी मालिकेत पदार्पण

मराठी टेलिव्हिजनविश्वात सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे ‘तू चाल पुढं’. दीपा परबची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या तुफान लोकप्रिय झाली आहे. एका सामान्य मिडिल क्लास गुरुहीची गोष्ट या मालिकेत दाखवली आहे. एक सामान्य गृहिणी असलेली आणि स्वतःच्या हिंमतीवर, मेहनतीवर आपले घर चालवण्याचा प्रयत्न करणारी अश्विनी जेव्हा एका सौंदर्यस्पर्धेत भाग घेते आणि तिला यात कोणत्या समस्या येत आहे, असा सध्या मालिकेत ट्रॅक सुरु आहे. या मालिकेत लवकरच एक ग्लॅमर्स चेहरा असलेल्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. बॉलिवूडमधील ही अभिनेत्री या मालिकेच्या माध्यमातून मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे.

सौंदर्य स्पर्धेतून माघार घेणारी अश्विनी पुन्हा या स्पर्धेसाठी होकार देते आणि अंतिम फेरीसाठी तयारी करत आहे. लवकरच या मालिकेत या सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न होणार आहे. या फेरीमध्ये परीक्षक म्हणून बॉलिवूडची खल्लास गर्ल, अर्थात ईशा कोप्पीकर दिसणार आहे. सध्या या मालिकेच्या सेटवरून ईशाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Koppikar Narang (@isha_konnects)

तू चाल पुढं या मालिकेत ईशा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून, ती सौंदर्य स्पर्धेचे परीक्षण करताना दिसणार आहे. आता ईशाला या मालिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत.

दरम्यान ईशा कोप्पीकर प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. तिने बॉलिवूडसोबतच अनेक तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने एक विवाह ऐसा भी, कृष्णा कॉटेज, कांटे, कयामत, शबरी, डार्लिंग हॅल्लो आदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच तिने फिक्सर आणि दहनाम या सिरीजमध्ये देखील काम केले आहे. यसोबतच ईशा अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जिनिलियाच्या तोंडून सर्वांसमोर ‘तो’ गोड शब्द ऐकून लाजेने लाल झाला रितेश देशमुख, व्हिडिओ झाला व्हायरल

राघव चड्ढा यांनी परिणीतीसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर तोडले मौन; ब्लश हाेत म्हणाले…