Friday, November 22, 2024
Home अन्य आलिया ते प्रियांका, ‘या’ अभिनेत्री आहेत फॅशन ब्रँड्सच्या मालकीण, कपड्यांच्या किंमती खिशाला परवडणाऱ्या

आलिया ते प्रियांका, ‘या’ अभिनेत्री आहेत फॅशन ब्रँड्सच्या मालकीण, कपड्यांच्या किंमती खिशाला परवडणाऱ्या

पैसा कमवणे कुणाला आवडत नाही, अर्थातच सर्वांनाच आवडते. प्रत्येकालाच आपले आयुष्य सुखकर करण्यासाठी पैसा कमवावा लागतो. यासाठी एकासोबतच इतर जोडधंद्याचाही आधार घेतला जातो. असेच काहीसे बॉलिवूड कलाकारही करतात. अभिनेत्यांचा काही ना काही जोडधंदा असतोच. यामध्ये अभिनेत्रीही मागे नाहीत. आताच्या पिढीच्या अभिनेत्री स्टाईल आयकॉन बनण्यासोबतच व्यवसायातही उडी घेत आहेत. अभिनेत्री आपल्या ब्रँडचे कपडे आणि सौंदर्यप्रसाधने मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे कपड्यांचे ब्रँडही आहेत आणि हे पूर्ण आत्मविश्वासाने सौंदर्यप्रसाधनाच्या व्यवसायात हात आजमावत आहेत. या यादीत प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाबद्दल.

दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्मा
अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने सन २०१५मध्ये ‘ऑल अबाऊट यू’ या नावाने आपले कपड्यांचे ब्रँड लाँच केले होते. तिचे मिंत्रासोबत कोलॅबरेशन आहे. या ब्रँडमध्ये १८ ते ३५ वर्षांपर्यंतच्या मुलींचे वेस्टर्न आणि एथनिक कपडे उपलब्ध आहेत. या कपड्यांची किंमत २५० रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत आहेत. याव्यतिरिक्त अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्या कपड्यांच्या ब्रँडबद्दल बोलायचं झालं, तर तिच्या कपड्यांच्या ब्रँडचे नाव ‘नश’ आहे. यामध्ये फक्त महिलांसाठी कॅज्युअल आणि ऑफिससाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचा समावेश आहे. हे कपडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकरांमध्ये उपलब्ध आहेत.

आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ
नुकतीच लग्नबंधनात अडकलेली प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने ‘एड-ए-मम्मा’ या नावाने मुलांच्या कपड्यांचा ब्रँड सन २०२०मध्ये सुरू केला होता. हा फर्स्ट क्रायवर उपलब्ध आहे. या ब्रँडमध्ये २ ते १४ वर्षांच्या मुलांसाठीचे कपडे उपलब्ध आहेत. दुसरीकडे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने हेअर केअर वस्तूंमध्ये गुंतवणूक केली आहे, जे एनोमेली नावाच्या शँपू, कंडीशनर आणि हेअर मास्कच्या रुपात बाजारात उपलब्ध आहेत. तसेच, कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हिने नायकासोबत मिळून सौंदर्यप्रसाधने लाँच केले आहेत. या ब्रँडचे नाव ‘काय’ असे आहे. आलियानेही नायकामध्ये गुंतवणूक केली आहे.

सोनम कपूर आणि श्रद्धा कपूर
प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची लेक आणि अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही आपली बहीण रिया कपूरसोबत ‘रेहसन’ नावाचे कपड्यांचे ब्रँड सुरू केले आहे. सोनम अधिकतर तिच्या बहिणीने डिझाईन केलेले कपडेच परिधान करते. जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिनेदेखील आपला ‘जस्ट एफ’ हा ब्रँड बाजारात आणला आहे. या ब्रँडच्या वस्तू १००० पासून ते ३००० हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने ‘डी२सी’ कपड्यांचा ब्रँड मायग्लॅममध्ये गुंतवणूक केली आहे. तीच याची ब्रँड एंबेसेडरदेखील आहे. यातील कपड्यांची किंमत ८०० पासून ते ४०००पर्यंत आहे.

सारा अली खान आणि सनी लिओनी
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने ‘द साऊल्ड स्टोर’मध्ये आपले पैसे गुंतवले आहेत. तिने म्हटले आहे की, या ब्रँडचे कपडे जितके फॅशनेबल आहेत, तितकेच कंफर्टेबलही आहेत. याव्यतिरिक्त सनी लिओनी (Sunny Leone) हिने सौंदर्यप्रसाधनांचा आपला ब्रँड लाँच केला आहे. त्याचे नाव ‘स्टारस्ट्रक बाय सनी लिओनी’ असे आहे. यातील वस्तूंची किंमत ६०० पासून ते १२०० पर्यंत आहेत.

अशाप्रकारे आणखी बऱ्याच अभिनेत्रींनी फक्त अभिनयावरच अवलंबून न राहता, इतर व्यवसायातही आपला हात आजमावला आहे.

अधिक वाचा-

रोमान्स रोमान्स आणि फक्त रोमान्स! निरहुआ अन् आम्रपालीचं ‘हे’ गाणं पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

‘या’ कॉमेडीयनने बिल्डरला लावला २० लाखांचा चुना, पोलिसांनी पाठवली नोटीस

शॉकिंग! अवघ्या तिशीत ‘या’ अभिनेत्याला झाली देवाज्ञा, कॅन्सरने घेतला बळी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा