Thursday, April 18, 2024

“संपल्यावरही रेंगाळून राहीन” अतिशय सुंदर आणि मार्मिक शब्दात ‘या’ विनोदवीराने पत्नीसाठी केलेली पोस्ट चर्चेत

चला हवा येऊ द्या या शोमुळे अनेक उत्तमोत्तम विनोदवीर मराठी मनोरंजनविश्वाला मिळाले. याच विनोदवीरांमधील एक नाव म्हणजे कुशल बद्रिके. कुशलने केवळ विनोदीच नाही तर इतरही अनेक भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारल्या आहेत. नेहमी विनोदी भूमिकांमधून समोर येणाऱ्या कुशलची अतिशय वेगळी बाजू सोशल मीडियावर बऱ्याचदा पाहायला मिळते. तो सोशल मीडियावर अनेक त्याच्या वैचारिक पोस्ट शेअर करत लोकांचे लक्ष वेधून घेत असतो. सोशल मीडियावरील पोस्टमुळे कुशल नेहमीच लाइमलाइट मिळवत असतो. अशातच आता पुन्हा एकदा तो त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

कुशलने सोशल मीडियावर त्याच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तो आणि त्याची पोस्ट खूपच गाजत आहे. लग्नाच्या वाढदिवसाचे निमित्तसाधत कुशलने पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली असून, सोबतच पत्नीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मला चहा खूप आवडतो आणि मी तो पितोही खूप. म्हणूनच कदाचित आपल्या लग्नाआधी काही नातेवाईक, माझ्याबद्दल तुला म्हणाले होते “he is not your cup of tea”. तरीही चहाच्या टपरीवरच्या भेटीपासून ते लग्नाच्या गाठीपर्यंतचा आपला प्रवास झालाच.

तू लक्ष्मीच्या पावलांनी “भाड्याच्या खोलीत” आलीस आणि नटराजाच्या पावलांनी “स्वतःच्या घरात” नाचू लागलीस. आता आपल्या घरात चहापाण्याला आलेल्या नातेवाईकांसोबत तू बसतेस आणि बऱ्याचदा त्यांना कॉफी पाजतेस. बहुतेक तुलाही पटलंय…I am not your cup of tea…I am your “cappuccino”

बघ, संपल्यावरही रेंगाळून राहीन “चवीसारखा”, तुझ्या आयुष्यात. एक गोड आठवण बनुन…….लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

कुशलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्या लिखाणाचे कौतुक तर केलेच आहे, सोबतच त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. कुशलची पत्नी सुनयना उत्तम डान्सर असून, ती डान्स क्लास घेते. अनेकदा चला हवा येऊ द्या मध्ये देखील याचा उल्लेख होताना आपण पहिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा