Saturday, September 30, 2023

बापाला आणखी काय हवं? मराठी अभिनेत्याची लेक झाली पायलट पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद

मनोरंजनविश्वात आपण पाहिले तर बहुतकरून कलाकारांची मुलं कलाकारच होताना दिसतात. घरातून लहानपणापासून जे बाळकडू मुलांना मिळते मुलं देखील त्यातच पुढे करियर करतात. मात्र अशी उदाहरणं मराठीमध्ये तुलनेत कमीच पाहायला मिळतात. आज जर मराठी इंडस्ट्रीमध्ये पाहिले तर अनेक कलाकारांची मुलं अभिनय सोडून इतर वेगळ्या क्षेत्रात करियर करताना दिसत आहे. आता देखील असेच काहीसे घडले आहे. मराठी आणि हिंदीमध्ये देखील प्रसिद्ध असे अभिनेते असलेल्या शरद पोंक्षे यांच्या मुलीने देखील करियरसाठी एका वेगळ्याच क्षेत्राची निवड केली आणि त्यात ‘भरारी’ देखील घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

शरद पोंक्षे यांनी नुकतीच त्यांच्या मुलीच्या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची मुलगी सिद्धी ही पायलट झाली असल्याची सुखद बातमी त्यांनी त्यांच्या पोस्टमधून दिली आहे. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत. कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हव नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा.”

दरम्यान शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळी आणि नेटकाऱ्यानी कमेंट्स करत त्यांच्या मुलीचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. या पोस्टसोबतच त्यांनी त्यांच्या मुलीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. शरद यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते सध्या विविध माध्यमांमध्ये काम करताना दिसत आहे. सध्या ते दार उघड बये आणि ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत दिसत आहे.

हे देखील वाचा