Tuesday, April 23, 2024

‘या’ दिग्गज संगीतकाराने भर कार्यक्रमात केली पत्नीला मातृभाषेत बोलण्याची विनंती, नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

भारतीय संगीत क्षेत्रातील मोठे नाव म्हणजे ए.आर.रहमान. आपल्या मोठ्या संगीताच्या करियरमध्ये त्यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी तयार केली. त्यांना देशविदेशातील अनेक मोठ्या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. रहमान यांनी हिंदी आणि तामिळ इंडस्ट्रीमध्ये जास्त काम केले. त्यांची मातृभाषा देखील तामिळ आहे. ते नेहमीच त्यांच्या मातृभाषेवर प्रेम करता आणि ती भाषा बोलण्यासाठी आग्रही असतात. असाच नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या हिंदी बोलणाऱ्या पत्नीला स्टेजवर थांबवले आणि तामिळ बोलण्यास सांगितले.

तामिळ इंडस्ट्रीमध्ये नुकताच एक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी ए.आर. रहमान त्यांच्या पत्नीसह उपस्थित होते. त्यांना या सोहळ्यामध्ये पुरस्कार देण्यात आला यावेळी त्यांची पत्नीदेखील मंचावर उपस्थित होती. याचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्टेजवर असणाऱ्या रहमान यांच्या पत्नीला सायराला सूत्रसंचालकाने तिला बोलण्याची विनंती केली तेव्हा रहमान यांनी सायराना तमिळमध्ये म्हणाले, “कृपया तमिळमध्ये बोल, हिंदीमध्ये नाही.” यावर सायरा म्हणाल्या, “माफ करा, पण मी तमिळमध्ये उत्तम प्रकारे बोलू शकत नाही. मी खूप खुश आहे कारण रहमानचा आवाज माझा सर्वात आवडता आवाज आहे. मी त्याच्या या सुरेल आवाजाच्या प्रेमात आहे.” तिचे रेहमानवर खूप प्रेम असून, ती त्याची मुलखात नेहमी दोन दोनदा बघते.

सध्या या व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत असून, नेटकाऱ्यानी देकील हा व्हिडिओ पाहून रेहमानने कौतुक केले आहे. त्याचे त्याच्या भाषेवरील प्रेम पाहून अनेकांनी त्याचा आदर्श घ्यायला पाहिजे असे म्हटले आहे. सोबतच एवढ्या भाषांमध्ये काम करूनही रेहमानने तामिळवरील प्रेम भरवणारे असल्याचे काहींनी लिहिले आहे.

दरम्यान रेहमानने संगीत दिलेल्या मणिरत्नम याच्या ”पोन्नियिन सेलवन 2′ हा सिनेमा आणि त्याची गाणी खूपच गाजत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘खोटी कारणं नका देऊ’ रेस्टोरंटमध्ये ‘या’ कारणासाठी प्रवेश नकारल्यानंतर संतापलेल्या उर्फीने शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध सेलिब्रिटी सारखे दिसण्याच्या नादान गमावला जीव, कॉस्मेटिक सर्जरीमुळे ‘या’ अभिनेत्याचा दुर्दैवी अंत

हे देखील वाचा