सलाम रे पठ्ठ्या! सोनूला भेटण्यासाठी ‘या’ व्यक्तीने केला तब्बल १२०० किमीचा सायकलप्रवास; अभिनेत्याने जोडले हात


बॉलिवूड अभिनेतासोबतच आता ‘देवदूत’ म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजे कोण? असा प्रश्न विचारल्यावर सर्वांच्या तोंडात फक्त एकच नाव येईल, आणि ते म्हणजे सोनू सूद होय. सोनूने जेव्हापासून कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे, तेव्हापासून गरजूंना मदत केली आहे. आता लोक त्याची देवाप्रमाणे पूजा करत आहेत. त्याच्यासाठी चाहते इतके वेडे झाले आहेत की, कुणी त्याला भेटायला शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत आहेत. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.

एक व्यक्ती सोनू सूदला भेटण्यासाठी तब्बल १२०० किलोमीटरचा सायकलप्रवास करून मुंबईत पोहोचला. या व्यक्तीने सायकलवर सोनूचा एक मोठा फोटो लावला आहे. हा व्यक्ती सोनूकडे खूप साऱ्या फुलांचे हार घेऊन पोहोचला होता, जे त्याने आपल्याकडून सोनूला भेट म्हणून दिले. (This Person Reached Actor Sonu Sood By Cycling From 1200 KM Away The Actor Welcomed In This Style)

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून समजते की, सोनूनेही अजूनही मदतीचे काम बंद केलेले नाही. तो सातत्याने लोकांची मदत करत आहे. त्यामुळेच लोक त्याला भेटण्यासाठी लांबून येत आहेत. या व्यक्तीला पाहताच सोनू भावुक झाला. सायकलवर आलेल्या या व्यक्तीने चप्पलदेखील परिधान केली नव्हती. हे पाहून सोनूने लगेच त्याच्यासाठी चप्पलची सोय केली. सोनूला भेटल्यानंतर या व्यक्तीने त्याच्या पायांवर फूल अर्पण केले. मात्र, सोनूने त्याला स्वत: हार घातले, आणि म्हटले की, हे सर्व करण्याची आवश्यकता नाही. सोनूने त्याचे हात जोडून स्वागत केले.

सोनूला भेटण्यासाठी लोक शेकडो- हजारो किलोमीटरवरून येत आहेत. यापूर्वी एका व्यक्तीने सोनूला भेटण्यासाठी ७०० किलोमीटरचा प्रवास केला होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सोनूने देशातील अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लान्ट लावण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर अभिनेत्याने त्याचे वचन पूर्ण करण्याचे कामही सुरू केले आहे. नुकतेच सोनूने आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये पहिला ऑक्सिजन प्लान्ट लावले आहे. या संपूर्ण प्लान्टचे सेटअप सोनूने स्वत: करवून घेतले आहे. अभिनेत्याने एका रक्षकाप्रमाणे देशात लोकांची मदत केली आहे. त्याने हेदेखील पाहिले नाही की, कोण गरीब आहे आणि कोण श्रीमंत आहे. त्याने फक्त लोकांची मदत केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नापूर्वी दिशाच्या रूमबाहेर ‘मेरी दुल्हन कहा है’, म्हणत ओरडताना दिसला राहुल; नववधू बाहेर येताच…

-सुपरस्टार नागार्जुनची सून समंथाने कुत्र्यासोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर, म्हणाली, ‘माझा गुड बॉय आणि…’

-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज


Leave A Reply

Your email address will not be published.