बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान गायक म्हणून शानला ओळखले जाते. नेहमीच हसतमुख चेहऱ्याने सर्वांनाच भुरळ घालणारा शान सध्या जरी कमी गाणी गाताना दिसत असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सतत त्याच्या फॅन्सच्या संपर्कात असतो. शान सतत विविध पोस्ट शेअर करत त्याची सोशल मीडियावरील उपस्थिती दर्शवतो. नुकताच ईद हा सण साजरा झाला. या निमित्ताने सर्वानीच सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शानने देखील त्याचा एक जुना फोटो शेअर करत सर्वांना ईद मुबारक म्हटले.
View this post on Instagram
शानने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो डोक्यावर टोपी घालून नमाज पढताना दिसत आहे. त्याने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ”तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ईद मुबारक..” हा फोटो शेअर केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी शानला ट्रोल केले. त्यानंतर मात्र शानने देखील त्याचा एक व्हिडिओ पोस्ट करत सर्वच ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले आहे. या व्हिडिओमध्ये त्याने काही गोष्टींवर त्याचे परखड मत व्यक्त केले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने ट्रोलर्सचा क्लास घेतला आहे.
शानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले, “आजच्या काळात लोकांचे विचार इतके पुढे गेले आहे, मात्र काहींचे विचार आजही मागेच आहे. आज ईद आहे. मी ३ वर्षापूर्वी एक व्हिडीओ केला होता. पलाश मुच्छलसाठी मी व्हिडीओ केला होता. ‘करम कर दे..’ असे त्याचे नाव होते. त्यामध्ये माझा असा लूक होता. मी विचार केला की ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो योग्य आहे…बस एवढेच होते.”
View this post on Instagram
पुढे शान म्हणाला, “मी कोणतेही स्पष्टीकरण देत नाही, फक्त माझे विचार मांडत आहे. आपल्या भारताची ओळखच अशी आहे की, आपण सर्वच सण आनंदाने साजरे करतो. प्रत्येक धर्माचा सम्मान करायला मला शिकवले आहे. हीच माझी विचारसरणी आहे आणि ही प्रत्येक भारतीय माणसाची विचारसरणी देखील अशीच असायला हवी. आज आपण प्रगतिशील भारतात राहतो. आपल्याला कोणत्या धर्मविरोधात नाही तर धर्मासोबत उभे राहायचे आहे. बाकी जसे प्रत्येकाचे विचार.” याशिवाय त्याने कमेंट सेक्शनमध्ये ‘जय परशुराम’ देखील लिहिले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अनुपम काका, पापा तुमच्यापेक्षा चांगला डान्स करायचे, पण…’ सतीश कौशिक यांच्या मुलीचा गोंडस व्हिडिओ व्हायरल
अर्चना गौतम कॅमेऱ्यासमोर झाली बोल्ड, अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही व्हाल अवाक्