हिंदी चित्रपट क्षेत्रात सध्या अनेक कलाकार विवाह बंधनात अडकताना दिसत आहेत. मात्र हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिका क्षेत्रात अशा अनेक अभिनेते आहेत ज्यांनी वयाची पस्तीशी उलटल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला कोण आहेत हे कलाकार चला जाणून घेऊ.
सीजेन खान –
‘कसोटी जिंदगी की’ मधून प्रसिद्ध झालेला कलाकार सीजेन खान लवकरच आपली गर्लफ्रेंड अफशीन खान सोबत विवाह करणार आहे. तो आता 44 वर्षाचा आहे. याबद्दल बोलताना त्याने लग्न करायचे काही निश्चित वय नसते असे विधान केले आहे.
मोहित रैना –
टीव्ही अभिनेता मोहित शर्मासुद्धा आपली गर्लफ्रेंड अदिती शर्मा सोबत विवाह बंधनात अडकला. याबद्दलची माहिती मोहितने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली होती. त्यानंतर अनेकवेळा दोघे फिरताना दिसले होते.
मनीष रायसिंघान –
जून 2020 मध्ये मनीषने आपली गर्लफ्रेंड संगीता चौहान सोबत लग्न केले त्यावेळी मनीषचे वय 41 वर्ष होते. मनीष आणि संगीताची ओळख एक शृंगार स्वाभिमान का मालिकेत झाली होती. तेव्हापासुन दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. नुकतीच संगीताने याबद्दल बोलताना “मनीष फक्त वयाने 41 वर्षीय आहे, त्याचे मन लहानच आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.
शरद मल्होत्रा –
‘बनु मैं तेरी दुल्हन’ मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता शरदने 20 एप्रिल 2019 मध्ये डिझायनर रिप्सी भाटियासोबत विवाह केला होता. तो 39 वर्षाचा आहे. याआधी तो अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सोबत रिलेशनशीप मध्ये होता.
गौतम रोडे –
अभिनेता गौतम रोडेला ‘सूर्यपुत्र कर्ण’ मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याने याच मालिकेतील सह कलाकार पंखुडी अवस्थीसोबत विवाह केला या लग्नाची कल्पना मात्र त्यांनी कुणालाही दिली नव्हती.
अनस रशीद-
‘दिया और बाती हम’ मालिकेतील अनस रशीदने वयाच्या ३७ व्या वर्षी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. त्याने हिना इकबासोबत २०१७ मध्ये विवाह केला. याबद्दल बोलताना अनस म्हणाला की, “माझा माझ्या पालकांवर विश्वास होता. त्यामुळे मी हा निर्णय त्यांच्यावर सोपवला होता. याबद्दल त्यांनीच हिनाची निवड केली आहे.”
शाहीर शेख –
अभिनेता शाहीर शेखने २०२०मध्ये रुचिका कपूरसोबत विवाह करत सगळ्यांना धक्का दिला होता. यावेळी शाहीर ३६ वर्षाचा होता. दोघांनी कोर्टमॅरेज केले होते. या लग्नात मालिकेत त्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पिळगावकरने हजेरी लावली होती.
विपुल रॉय-
टिव्ही अभिनेता विपुलनेही वयाची पस्तीशी उलटल्यानंतर लग्न केले होते. त्याने डिसेंबर २०२१ मध्ये मेलिन एटीससोबत विवाह केला होता .
हेही वाचा –