Saturday, June 29, 2024

मजा मस्तीमध्ये सायकल चालवणाऱ्या अक्षयचा तोल बिघडला आणि तो धप्पकन पडला….

अक्षय कुमार नेहमीच त्याच्या चित्रपटांसाठी आणि चित्रपटांमधील त्याच्या दमदार ऍक्शनसाठी ओळखला जातो. तो त्याच्या फिटनेसबाबत खूपच सजग आणि शिस्तप्रिय आहे. त्याचा फिटनेस नेहमीच सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. ती जितका प्रभावी अभिनेता आहे, तितकाच अव्वल तो व्यायामात आहे. अक्षय अनेकदा त्याच्या व्यायामाचे, जिमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. अक्षय कुमार जेवढा व्यायामाचा फॅन आहे, तेवढाच तो सायकलिंगचा देखील फॅन आहे. तो अनेकदा त्याचे सायकलिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

सध्या सूर्यवंशी सिनेमामुळे चर्चेत असणाऱ्या अक्षय कुमारचा एक जुना सायकलिंग करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय मजा मस्ती करत, वातावरणाचा आनंद घेत गप्पा मारत असतो, आणि तेवढ्यात तो धपकन पडतो. हा व्हिडिओ ऑगस्ट २०१७ च्या स्वातंत्र्य दिनाचा असून, या व्हिडिओमध्ये तो सांगतो की, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत म्हणतो की, तो त्या देशात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे, ज्या देशापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हा व्हिडिओ ‘गोल्ड’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा असून, यात तो कॅमेराकडे बघत गप्पा मारत असताना त्याचा तोल जातो आणि तो पडतो.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1451397786893750273?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1451397786893750273%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fbollywood%2Fakshay-kumar-fall-from-cycle-throwback-video-viral-2583861

सध्या अक्षय त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ सिनेमासाठी खूपच प्रकाशझोतात आला आहे. मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रतीक्षा होती. २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाला कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे प्रदर्शित केले गेले नव्हते. सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला होता मात्र सिनेमा प्रदर्शित झाला नाही. अखेर आता या सिनेमा दिवाळीमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बऱ्याच काळाने कॅटरिना आणि अक्षय मोठया पडद्यावर सोबत दिसणार आहे.

‘सूर्यवंशी’सोबतच अक्षयचे ‘बच्चन पांडे’, ‘रक्षा बंधन’, ‘रामसेतु’, ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘मिशन सिंड्रेला’, ‘ओएमसी- ओह माय गॉड 2!’ आदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनन्या शाहरुख खानला म्हणाली होती ‘सेकंड डॅड’, नेमकं प्रकरण काय?

-आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड

-‘डीडीएलजे’ चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण; ‘या’ अभिनेत्याने नकार दिल्याने शाहरुख बनला ‘किंग ऑफ रोमान्स’

हे देखील वाचा