‘आप के आ जाने से’ गाण्यातील अभिनेत्रीसोबत करायचे होते गोविंदाला लग्न, पण गपगुमान बांधावी लागली सुनीताशी लगीनगाठ

Throwback Superstar Govinda Wanted To Marry Neelam Kothari Yer Could Not Get Seven Rounds Due To This Big Reason


‘आप के आ जाने से’ हे गाणं ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर झटकन नाव येतं, ते म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांचं. ८० ते ९० या दशकात ही जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी होती. गोविंदा आणि नीलमने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सन १९८६ मध्ये रिलीझ झालेला ‘इल्जाम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तोंडघशी पडला, परंतु गोविंदा आणि नीलम यांची केमेस्ट्री मात्र चाहत्यांना भलतीच आवडली. आता या दोघांनीही चित्रपटांपासून स्वत: ला दूर केले आहे. एकेकाळी गोविंदाला नीलमसोबत लग्न करायचे होते, परंतु ते होऊ शकले नाही. या प्रसिद्ध जोडीचे लग्न का होऊ शकले नाही, याबाबत आज या लेखात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया…

नीलमचा जन्म ९ नोव्हेंबर, १९६९ रोजी हाँगकाँगमध्ये झाला होता, परंतु ती वाढली बँकॉकमध्ये. नीलमची बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्याची कहाणी अत्यंत रंजक आहे. खरं तर नीलम एकदा मुंबई फिरण्यासाठी आली होती. याचदरम्यान दिग्दर्शक रमेश बहल यांनी तिला पाहिलं आणि एका चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर दिली. तिने ही ऑफर स्वीकारली आणि सन १९८४ मध्ये ‘जवानी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटात तिच्यासोबत करण शाह मुख्य भूमिकेत होते.

तिचा हा पहिलाच चित्रपट सपशेल फ्लॉप ठरला, परंतु नीलमची सुंदरता आणि तिचा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला. यानंतर तिला बऱ्याच ऑफर मिळाल्या. तिने बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि सलमान खान यांच्यासोबतही काम केले आहे.

तिने गोविंदासोबत सन १९८६ मध्ये ‘लव्ह ८६’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. यानंतर ती गोविंदासोबत ‘सिंदूर’, ‘खुदगर्ज’, ‘हत्या’, ‘फर्ज की जंग’, ‘ताकतवर’ आणि ‘दो कैदी’ यांसारख्या चित्रपटातही झळकली. तिने गोविंदासोबत एकूण १० चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी ६ चित्रपट हिट ठरले. त्यांचा सन २००१ साली रिलीझ झालेला ‘कसम’ हा शेवटचा चित्रपट होता.

आईमुळे गोविंदाने सोडले नीलमला
नीलमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर तिचे गोविंदासोबत अनेक वर्ष अफेअर सुरू होते. त्यावेळी गोविंदाही नवीनच होता. ज्यावेळी तो नीलमला भेटला, त्याचवेळी तो तिच्या प्रेमात पडला. त्यावेळी गोविंदा, सुनितालाही डेट करत होता. नीलममुळे सुनीता आणि गोविंदामध्ये चांगलंच भांडण व्हायचे. इतकेच नव्हे, तर नीलमसाठी त्याने सुनीतासोबत आपला साखरपुडाही मोडला होता. त्याला नीलमसोबत लग्न करायचे होते, परंतु गोविंदाच्या आईला असे वाटत होते की, त्यांनी सुनिताला आपला शब्द दिला आहे, त्यामुळे गोविंदाने तिच्याशीच लग्न केले पाहिजे.

आपल्या आईच्या शब्दाखातर गोविंदाने नीलमला सोडून दिले होते. नीलमने सन २०११ मध्ये अभिनेता समीर सोनीसोबत लगीनगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनीही एका मुलीला दत्तक घेतले.

गोविंदाला २ अपत्य आहेत. त्याच्या मुलीचे नाव टीना आहुजा, तर मुलाचे नाव यशवर्धन आहुजा असे आहे.

नीलमने ‘हम साथ साथ है’ चित्रपटात सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त तिने ‘एक था राजा’, ‘एक लडका एक लडकी’ यांसारख्या चित्रपटातही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-समंथापासून ते कीर्तिपर्यंत टॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री कमावतात बक्कळ पैसा, एका चित्रपटासाठी घेतात कोट्यवधी रुपये

-खतरनाक! वयाच्या बाराव्या वर्षी गायले पहिले गाणे, वयाच्या २७व्या वर्षी जस्टीन बिबर झालाय ‘एवढ्या’ अब्ज रुपयांचा मालक

-प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणाऱ्या ‘या’ विनोदी अभिनेत्याला बनायचं होतं भलतंच काही


Leave A Reply

Your email address will not be published.