आज बॉलिवूडच्या सर्वात बोल्ड एँड ब्युटीफुल आणि फिट अभिनेत्री असलेल्या दिशा पटानीने रविवारी (१३ जून) आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीमधे पदार्पण केलेल्या दिशाने खूप कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी दिशाला फॅन्ससोबतच कलाकार देखील शुभेच्छा देत आहे. यासर्वांमधे आज एका शुभेच्छेने सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले आहे. या शुभेच्छा आहेत, टायगर श्रॉफच्या.
दिशाच्या वाढदिवशी टायगरने त्याचा आणि दिशाचा एका डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिलन.” सोबतच त्याने हार्ट ईमोजी देखील पोस्ट केले आहेत. टायगरसोबतच त्याची बहीण कृष्णा श्रॉफने या व्हिडिओवर ‘हाहाहा द फ्लो’ अशी कमेंट केली आहे.
यासोबतच टायगर श्रॉफच्या आईने आयेशा श्रॉफने देखील दिशाला शुभेच्छा देताना दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत गाईचे वासरू दिशासोबत दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत दिशा आणि टायगरची आई आयेशा श्रॉफ दिसत आहेत. या फोटोंसोबत आयेशा श्रॉफ यांनी लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा दिशू…सर्व लोकं तुझी ग्लॅमरस बाजू बघतात. मात्र, मला तुझी ही बाजू सर्वात जास्त आवडते.”
टायगर आणि दिशा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या नेहमीच मीडियामध्ये येत असतात. मात्र, या दोघांनी अजून त्यांचे नाते अधिकृतरीत्या जाहीर केले नाहीये. या दोघांना अनेकदा कार्यक्रमांना हजेरी लावताना, सोबत सुट्या घालवताना, बाहेर फिरताना पाहिले जाते. त्यांचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात. दिशा टायगरच्या कुटुंबाच्या देखील खूप जवळ आहे.
दिशाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमधून अभिनयाची सुरुवात केली. दिशाने खूप कमी वयात मोठे यश संपादन केले आहे. फक्त ५०० रुपये घेऊन मुंबई आलेली दिशा आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-यामी गौतमची बहीण सुरिलीने केला तिचा साज श्रृंगार; अभिनेत्रीने केला लग्नातील न पाहिलेला व्हिडिओ