Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड चाहत्याचं वेड ते! समोर प्रत्यक्षात टायगर श्रॉफला पाहून बेशुद्ध पडली चाहती, मात्र पाहून अभिनेत्याने…

चाहत्याचं वेड ते! समोर प्रत्यक्षात टायगर श्रॉफला पाहून बेशुद्ध पडली चाहती, मात्र पाहून अभिनेत्याने…

आपल्या आवडत्या कलाकारांसाठी चाहते काहीही करायला तयार असतात. तसेच, चहित्या नायक-नायिकेची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासन्तास थांबतात, कधी रांगेत, तर कधी गर्दीत. पण अलीकडेच टायगर श्रॉफला (Tiger Shroff) पाहण्यासाठी आलेल्या चाहतीने त्याची झलक पाहिल्याबरोबरच, असा काहीसा प्रकार घडला की सगळे बघतच राहिले. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की टायगर श्रॉफ त्याच्या आगामी ‘हिरोपंती २’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका ठिकाणी पोहोचला. यादरम्यान त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहतेही मोठ्या संख्येने पोहोचले. रखरखत्या उन्हात तासन्तास उभे राहून चाहते अभिनेत्याची वाट पाहत होते. व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, अभिनेता चाहतीसमोर येताच त्याची चाहती त्याला पाहून बेहोश झाली. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे,”टायगरला पाहून झाली बेशुद्ध.” (tiger shroff fan fainted after seeing him during heropanti 2 promotion)

अभिनेत्याने केले ‘असे’ काही
चाहतीला या अवस्थेत पाहून टायगर श्रॉफ स्वतःला रोखू शकला नाही. टायगरने या चाहतीला स्टेजवर बोलावून मिठी मारली. यासोबतच तिच्यासोबत थोड्या गप्पाही मारल्या. टायगरला चाहत्याशी असं बोलतांना पाहून तिथे जमलेले त्याचे अनेक चाहते खूश झाले आणि अभिनेत्याचे औदार्य पाहून जोरजोरात ओरडू लागले.

दिशा-टायगर करत आहेत डेटिंग
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी (Disha Patani) बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची जोडी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ वीकेंड, डिनर, व्हेकेशनला नेहमी एकमेकांसोबत स्पॉट केले जातात. मात्र या दोघांनी हे नाते अद्याप अधिकृत केले नाही.

‘या’ दिवशी रिलीझ होणार चित्रपट
‘हिरोपंती २’ चित्रपटात टायगर श्रॉफशिवाय तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे आणि साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट २९ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा