Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती जागवणारे टायगर श्रॉफच्या आवाजातील ‘वंदे मातरम’ गाणे प्रदर्शित

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती जागवणारे टायगर श्रॉफच्या आवाजातील ‘वंदे मातरम’ गाणे प्रदर्शित

सध्या सगळीकडेच देशप्रेमाचे, देशभक्तीचे वारे वाहत आहे. लवकरच आपण आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. त्याच पार्श्वभूमीवर अनेक मोठे देशभक्तीवर आधारित सिनेमे प्रदर्शित होणार आहे. यासोबतच अनेक म्युझिक अल्बम देखील प्रदर्शित होत आहे. नुकतेच टायगर श्रॉफचे ‘वंदे मातरम’ हे गाणे देखील प्रदर्शित झाले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने टायगर श्रॉफचे ‘वंदे मातरम’ गाण्याचे रिप्राइज्ड हिंदी वर्जन लॉन्च करण्यात आले आहे. या गाण्यातून टायगरने गायक म्हणून पदार्पण केले आहे. गाण्याच्या टीमने हे गाणे भारतीय संरक्षक दल आणि भारतीय नागरीकांना अर्पण केले आहे. काही दिवसांपूर्वीच या गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आज हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. (vande mataram song reprised version released)

 

या गाण्याचा निर्माता असणाऱ्या जॅकी भगनानीने त्याच्या सोशल मीडियावर या गाण्याची एक क्लिप शेअर करत लिहिले, “हे गाणे आपल्या गौरवशाली देशाचे रक्षण करणाऱ्या दलाला आणि येथील लोकांना समर्पित आहे. अतिशय सन्मानाने आणि गर्वाने आम्ही आपणास समर्पित करत आहोत. हॅशटॅग वंदेमातरम.”

तर टायगर श्रॉफने देखील गाण्याची एक क्लिप पोस्ट करत लिहिले, “हे गाणे आपल्या गौरवशाली राष्ट्राला आणि इथल्या लोकांना समर्पित, असे करण्यासाठी हा एक अविश्वसनीय प्रवास राहिला आहे. अतिशय अभिमानाने आणि सन्मानाने, मी तुमच्यासमोर माझे पहिले गाणे सादर करत आहे. हे गाणे माझ्यासाठी खूपच खास आणि हृदयाच्या जवळ राहील.”

या गाण्याला थोड्याच वेळात भरभरून प्रतिसाद मिळाला असून, गाण्यासाठी टायगरचे त्याच्या संपूर्ण टीमचे फॅन्स आणि कलाकारांकडून भरभरु कौतुक केले जात आहे. विशाल मिश्रा यांनी रचलेल्या या गाण्याला कोरियोग्राफर रेमो डिसूजाने दिग्दर्शित केले आहे. हे गाणे कौशल किशोर यांनी लिहिले आहे.

‘वंदे मातरम’ गाण्याचे कौतुक करताना टायगरच्या कथित गर्लफ्रेंडने कमेंट करत लिहिले, “एवढ्या सुंदर आवाजाने त्याला चमकावले आहे.” तर रितेश देशमुखने लिहिले, “अद्भुत, जय हिंद” याशिवाय अनेक कलाकारांनी या गाण्याचे कौतुक केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा