सिनेविश्वातील आणखी एका दिग्गज कलाकाराने जगाचा निरोप घेतला आहे. ‘बॅटमॅन: द लाँग हॅलोवीन’ आणि ‘सुपरमॅन फॉर ऑल सीझन’ सारख्या संस्मरणीय कॉमिक्सचे कलाकार टिम सेल (Tim Sale) यांचे गुरुवारी (१६ जून) वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “टिम सेल यांचे आज निधन झाल्याचे जाहीर करताना अत्यंत दु:ख होत आहे. त्याचे तुम्हा सर्वांवर खूप प्रेम होते. कृपया या पोस्टसह फोटो आणि स्टोरीज शेअर करा.”
It’s with a heavy sadness that I must announce that Tim Sale passed away today. He passed with the love of his life beside him, and loves all of you very much. Please share photos and stories under this post, as we hope to share them with the community.
— Remembering Tim Sale (@ArtBySale) June 16, 2022
डीसी कॉमिक्सने व्यक्त केलं दु:ख
त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. या आठवड्यात सेलला गंभीर आरोग्य समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी दिली होती. अशातच डीसी कॉमिक्सनेही अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. डीसी कॉमिक्सचे प्रकाशक आणि मुख्य कार्यकारी म्हणाले की टिम एक असाधारण कलाकार होते. त्याच्या ग्राउंडब्रेकिंग पेज डिझाइनने कॉमिक बुक स्टोरीटेलिंगबद्दल संपूर्ण पिढीचा विचार बदलला. टिम आम्हा सर्वांना तुझी खूप आठवण येईल. त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो.” (tim tale batman the long halloween comic book artist dies at 66)
Tim Sale was an incredible artist, whose take on iconic characters had real human depth, and his groundbreaking page designs changed the way an entire generation thinks about comic book storytelling. Our condolences go to Tim’s family and friends. He will be deeply missed. pic.twitter.com/VgXxu7O0V4
— DC (@DCComics) June 16, 2022
‘या’ कथांवरही केलंय काम
त्यांनी केवळ ‘बॅटमॅन’साठीच काम केले नाही, तर टिमने सहकारी कॉमिक्स लेखक जेफ लोएबसोबत ‘सुपरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘स्पायडर-मॅन’ आणि ‘कॅप्टन अमेरिका’ यांच्या कथांवरही काम केले. सर्व सुपरहिरोच्या कथा घराघरात पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश होता. हे सर्व जेफ लोएब यांनी लिहिलेले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा