Tuesday, August 12, 2025
Home साऊथ सिनेमा लेकीचं काैतूक करताना महेश बाबूच्या आनंदाला भरती; म्हणाला, ‘फटाखा…’

लेकीचं काैतूक करताना महेश बाबूच्या आनंदाला भरती; म्हणाला, ‘फटाखा…’

तेलगू सुपरस्टार महेश बाबू यांची लेक सितारा ही केवळ 11 वर्षांची आहे आणि तिने सर्वत्र आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. स्टार किड सिताराची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. तिची प्रत्येक पोस्ट लगेच व्हायरल होते. टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर पदार्पण करणारी सितारा ही पहिली स्टारकिड आहे. सिताराने तिच्या पदार्पणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर सिताराच्या पदार्पणामुळे महेश बाबू खूप आनंदी आहेत. मुलीच्या एवढ्या मोठ्या अचिव्हमेंटची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. अशात महेश बाबू यांची पोस्ट साेशल मीडियावर तुफान व्हायरल व्हायरल होत आहे.

सितारा (sitara) हिने ही आनंदाची बातमी तिच्या पाेस्टद्वारे साेशल मीडियावर शेअर केली आहे. काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, “टाइम्स स्क्वेअर…. ओह माय गाॅड, क्राईड अॅन्डा शाॅउटेड पीएमजे ज्वेलरी तुमच्याशिवाय हे करू शकली नसती.”

महेशा बाबूने सिताराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लिहिले ,”टाइम्स स्क्वेअरला राेशन कर. खूप अभिमान आहे तुझा फटाखा. असेच चमकत राहा.” महेश बाबूच्या या पाेस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

सिताराची आई नम्रताही खूप खुश आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून आपला उत्साह शेअर केला. तिने लिहिले, “टाइम्स स्क्वेअरवर कोण डेब्यू केले ते पहा. मी किती आनंदी आहे याचे शब्दात वर्णन करता येत नाही. सितारा तुमची स्वप्ने सत्यात उतरताना पाहून खूप छान वाटते. माझा सुपरस्टार चमकत राहा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by sitara ???? (@sitaraghattamaneni)

मंडळी, सितारा ही ज्वेलरी ब्रँड पीएमजेची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ती तिच्या वडिलांसोबत डान्स व्हिडिओमध्ये दिसली आहे. इतकेच नाही, तर ‘फ्रोजन 2’च्या तेलुगु व्हर्जनमध्ये सिताराने बेबी एल्साचा आवाज दिला आहे.(tollywood actor mahesh babu daughter sitara makes her debut on times square billboard )

अधिक वाचा-

एकता कपूरने फाडला हाेता स्मृती इराणींचा कॉन्ट्रॅक्ट; वर्षांनंतर केला खुलासा, म्हणाली…
प्लेबॅक सिंगर नाही, तर वेगळंच होतं जावेद अलीचं स्वप्न, खास व्यक्ती गमावल्याने बदलले नाव

हे देखील वाचा