Tuesday, April 23, 2024

राम चरण पत्नी अन् चिमुरडीला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, व्हिडिओ व्हायरल

लग्नाच्या 11 वर्षानंतर राम चरण याची पत्नी उपासना हिने 20 जून रोजी एका मुलीला जन्म दिला. अभिनेत्याच्या पत्नीला 19 जून रोजी संध्याकाळी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान मध्यरात्री उपासनाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. अशात आता बाळाला जन्म दिल्यानंतर चार दिवासांनी उपासना आणि बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, रामचरण याचा मुलगी आणि पत्नीसोबतचा पहिला व्हिडिओही समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये राम चरण (ram charan) आणि त्यांची पत्नी उपासनासाेबत (upasana ) हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यावेळी नवजात बाळाचा चेहरा झाकलेला आहे. यादरम्यान राम चरण यांनी त्यांची मुलगी आणि पत्नी उपासना हिच्या तब्येतीची अपडेटही मीडियाला दिली.

राम चरणच्या मुलीच्या स्वागताची तयारी शनिवारपासूनच सुरू झाली होती. या जाेडप्यानी प्रथम त्यांच्या मुलीसाठी हाताने तयार केलेला पाळणा विकत घेतला, जाे ह्यूमन ट्रैफिकिंग लोकांनी बनवला आहे. आरआरआर गायक कला भैरव यांनी देखील राम चरणच्या मुलीसाठी एक खास आणि अर्थपूर्ण धून तयार केली आहे.

आजोबा झाल्याचा आनंद चिरंजीवीने अशा प्रकारे केला व्यक्त 
आजोबा झालेल्या चिरंजीवीने एक पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला होता. आपल्या पोस्टमध्ये, बाळाचे स्वागत करताना, त्यांनी लिहिले, ‘स्वागत आहे छोटी मेगा प्रिन्सेस!! तुम्ही लोकांमध्ये आनंद पसरवलात, तुमच्या आगमनाने करोडोंचा मेगा परिवार धन्य झाला आहे. राम चरण आणि उपासना यांना आई-वडील आणि आम्हाला आजी-आजोबा बनवल्याचा आनंद आणि अभिमान आहे!!’

चाहते रामचरण आणि उपासना यांच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होते. 14 जून रोजी राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला आणि 5 दिवसांनी राम चरण आणि उपासना यांच्या घरात आनंदाने दार ठोठावले. सध्या हे कपल त्यांच्या छोट्या परीबद्दल खूप उत्सुक आहे.(tollywood actor ram charan wife upasana and daughter discharged from hospital first picture surfaced )

अधिक वाचा-
गरोदर सना खानची ‘अशी’ झालीये अवस्था, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

‘मिस यू..,’ म्हणत मुग्धा वैशंपायनने काढली प्रथमेश लघाटेची आठवण; म्हणाली…

हे देखील वाचा