Saturday, March 2, 2024

पुष्पामधील आयटम डान्ससाठी समांथाचे कुटुंब नव्हते तयार, अभिनेत्रीला दिला हाेता घरी बसण्याचा सल्ला

साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या क्युटनेस आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी समंथा सध्या ‘शकुंतलम‘ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान अभिनेत्रीने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने अनेक गुपिते उघड केली आहेत. अशात समांथाने ‘पुष्पा’ चित्रपटासाठी आयटम साँग करण्यास नकार देण्याचे कारणही सांगितले आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

समांथा (samantha ruth prabhu) हिने माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘जेव्हा मला ‘ओ अंटवा’ गाणं ऑफर करण्यात आले, तेव्हा मी घटस्फोट घेणार होते. अधिकृत घोषणेनंतर लोकांनी मला आयटम साँग करू नकाे असे सांगितले. तेही त्यांनी जे माझे जवळचे मित्र होते, ज्यांनी मला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. तेच मला बॅकआउट करण्यास सांगत हाेते.’

सामंथा पुढे म्हणाली, ‘मला वाटले की, मी काही गुन्हा केला आहे का? मी का लपवू? मी काहीही चुकीचे केले नाही. लोक माझा तिरस्कार करतात, मला ट्रोल करतात म्हणून मी थकून घरी बसून राहू? मी वाट पाहू शकत नाही. मी लपून बसणार नव्हती. कारण, मी कोणताही गुन्हा केलेला नव्हता.’ तिच्या लग्नाबद्दल बोलताना समंथा पुढे म्हणाली, ‘मी लग्नाला माझे 100% दिले. ते स्कसेस नाही झाले त्यात माझा दोष नाही. त्याबद्दल मी स्वत:ला दोष ठरवू शकत नाही.’

या गाण्याला सहमती देण्याचे कारण सांगताना समंथा म्हणाली, ‘मला गाण्याचे बोल खूप आवडले. मी कधीही आयटम साँग केले नव्हते. मला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारायला आवडतात. मी ते आयटम साँग म्हणून पाहिले नाही, ते माझ्यासाठी दुसरे पात्र होते.’ समंथाच्या म्हणण्यानुसार, अल्लू अर्जुनने तिला गाण्याच्या शूटिंगदरम्यान खूप मदत केली. अल्लूला हे गाणे योग्य स्टिरिओटाइप आयटम साँग म्हणून पाहायचे नव्हते.(tollywood actress samantha ruth prabhu family was not ready for item dance in pushpa advised to sit at home)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राखीने उडवली मलायका अरोराच्या चालण्याची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल लाेटपाेट

‘भीतीपेक्षा जास्त स्वतःवर विश्वास ठेवला’ अभिज्ञा भावेने पोस्टमधून शेअर केला तिचा खास अनुभव

हे देखील वाचा