Saturday, March 2, 2024

राखीने उडवली मलायका अरोराच्या चालण्याची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल लाेटपाेट

‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी वादग्रस्त विधाने, कधी वैयक्तिक आयुष्य, तर कधी व्हायरल व्हिडिओमुळे अभिनेत्री सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशात नुकतीच राखी सावंत मलायका अरोराची खिल्ली उडवताना दिसली. तिने मलायकाच्या चालण्याच्या स्टाईलची नक्कल केली आणि त्यावर भाष्यही केले, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

नुकतीच राखी सावंत (rakhi sawant) मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान ती मलायका अरोराप्रमाणे फिरताना दिसली. तिने मलायका अरोराच्या चालण्याच्या शैलीची नक्कल केली. याशिवाय राखी म्हणाली, “आम्हाला मलायकाचे चालणे खूप आवडते. मलायकाच्या चालण्याणे आम्हाला वेड लावले आहे. आजपासून पुढे आम्ही असेच चालू. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.”

मंडळी, आम्ही तुम्हाला सांगताे की, मलायका अरोरा तिच्या चालण्याच्या स्टाइलमुळे अनेकदा ट्रोल झाली आहे. तिच्या चालण्याच्या स्टाइलवर साेशल मीडिया युजर्स कायमच भिन्नभिन्न कमेंट करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंत काही दिवसांपूर्वी आदिल खानसोबत तिच्या नात्यामुळे चर्चेत हाेती, राखीने गेल्या वर्षी आदीलसाेबत गुपचूप लग्न केले होते, ज्याचा खुलासा अभिनेत्रीने साेशल मीडियावर मॅरिज सर्टिफिकेट शेअर करून केला होता. तेव्हापासून राखीने अनेकवेळा आदिलवर आरोप केले आहेत, ज्यानंतर आदिलला तुरुंगात टाकण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

पतीला जेलमध्ये टाकल्यानंतर राखीने दुबईत तिची डान्स अकादमी उघडली. याव्यतिरिक्त अलीकडेच राखीचा म्युझिक व्हिडिओमध्येही आला, ज्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली.(tv actress rakhi sawant mimic actress malaika arora walking style video viral on instagram)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सैफच्या आधी अमृता पडली हाेती ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात; प्रकरण लग्नापर्यंतही पाेहाेचले हाेते, पण…

कृष्णधवल’ फिल्टरमध्ये रुपाली भाेसलेचं मोहक साैंदर्य, एकदा पाहाच

हे देखील वाचा