‘शकुंतलम‘ रिलीज झाल्यानंतर, समंथा रुथ प्रभू तिची आगामी सीरिज ‘सिटाडेल’साठी चर्चेत आहे. अभिनेत्री वरुण धवनसोबत कठाेर मेहणत घेऊन सीरिजसाठी शूटिंग करत आहे. यासोबतच तिच्याकडे विजय देवरकोंडा यांचा ‘खुशी’ हा चित्रपटही आहे. अशा परिस्थितीत, समंथा आजकाल तिच्या व्यावसायिक जीवनात खूप व्यस्त आहे आणि तिच्या आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष हाेत आहे. दरम्यान, आता बातमी येत आहे की, समंथाने तिच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी चित्रपटांमधून एक वर्षाचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, समंथाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, ‘अभिनेत्री तिच्या सर्व प्रोजेक्ट्सचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर चित्रपटांमधून एक वर्षाचा ब्रेक घेईल आणि पूर्णपणे तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करेल.’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘समंथा सध्या विजय देवरकोंडासोबत ‘खुशी’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. चित्रपटाचे हे शेवटचे शूटिंग शेड्यूल आहे, जे दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल.’
सूत्राने पुढे सांगितले की, ‘ती कामातून एक वर्षाचा ब्रेक घेईल आणि कोणताही नवीन तेलुगू किंवा बॉलिवूड चित्रपट साइन करणार नाही. तिची तब्येत सावरण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी या वेळेचा उपयोग करण्याची तिची योजना आहे. समंथाने निर्मात्यांची अॅडव्हान्स रक्कमही परत केली आहे, जी तिने आधी घेतली होती.’
View this post on Instagram
गेल्या वर्षी 2022च्या अखेरच समंथाने उघड केले की, ‘तिला मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून रोगाचे निदान झाले आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.’
View this post on Instagram
समंथा रुथ प्रभूच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘शकुंतलम’ चित्रपटात दिसली होती. लवकरच ही अभिनेत्री वरुण धवनसोबत तिच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यासोबतच समंथा रुथ प्रभू ‘खुशी’ चित्रपटात विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.(tollywood actress samantha to take one year long break from films after completing commitments to focus health )