Wednesday, June 26, 2024

ओटीटीवरील ‘हे’ ५ सर्वोत्तम चित्रपट बनवतील तुमचा दिवस खास; तिसऱ्या क्रमांकाचा सिनेमा तर नक्कीच पाहा

ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसीरिज पाहण्याची क्रेझ वाढत आहे. हेच कारण आहे की, आता अधिकाधिक चित्रपट आणि वेबसीरिज फक्त ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट थांबल्यानंतर देशातील अनेक भागातील चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू झाली असली, तरी ओटीटीची लोकप्रियता कमी झालेली नाही. कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ हा चित्रपट शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात कार्तिकसोबत मृणाल ठाकूर आहे. याआधीही असे काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत, जे तुम्ही जरूर पाहिले पाहिजेत. चला तर मग ओटीटीवर नुकतेच प्रदर्शित झालेल्या या पाच सर्वोत्तम चित्रपटांवर एक नजर टाकूया…

रश्मी रॉकेट- झी-५
अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ चित्रपट झी-५ वर प्रदर्शित झाला होता. ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटात तापसीशिवाय श्वेता त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशू पैन्युली आणि सुप्रिया पाठक यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराणा यांनी केले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर नक्की पाहा.

सरदार उधम- ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ
अभिनेता विकी कौशल अभिनित ‘सरदार उधम’ चित्रपट ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. ‘सरदार उधम’ या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांमध्ये चांगलीच पसंती मिळाली आहे. त्याचवेळी, चित्रपटाच्या स्टार कास्ट आणि निर्मात्यांनी देखील यावर खूप मेहनत घेतली आहे, जी चित्रपटात देखील स्पष्टपणे दिसून येते.

जय भीम- ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ
अभिनेता सूर्याच्या ‘जय भीम’ या चित्रपटाची स्तुती करावी तितकी कमी आहे. ज्यांनी आजपर्यंत हा चित्रपट पाहिला नसेल, त्यांच्यापैकी तुम्ही असाल, तर उशीर करू नका, या वीकेंडचा आनंद घ्या. या चित्रपटाचे समीक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे.

मीनाक्षी सुंदरेश्वर- नेटफ्लिक्स
‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा चित्रपट एका नवविवाहित जोडप्याची कथा सांगतो. लाँग डिस्टन्स रिलेशन, करिअरच्या निवडी आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या इतर अनेक आव्हाने यामध्ये दाखवण्यात आली आहेत. सान्या मल्होत्रा ​​आणि अभिमन्यू दासानी अभिनित हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

‘हम दो और हमारे दो’- डिझनी प्लस हॉटस्टार
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि क्रिती सेनन यांचा चित्रपट ‘हम दो और हमारे दो’ डिझनी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

राजकुमार राव आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त या कॉमेडी रोमँटिक चित्रपटात परेश रावल, रत्ना पाठक आणि अपराशक्ती खुराना देखील आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरसोबत केली होती अभिनयाची सुरुवात, तर ‘असा’ होता तुषार कपूरच्या कारकिर्दीचा आलेख

-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे

हे देखील वाचा