Wednesday, December 6, 2023

‘बाहुबली’च्या कटप्पाची प्रकृती बिघडली, तातडीने करण्यात आले रुग्णालयात दाखल

देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सरकार आणि कलाकारही यामुळे चिंतेत आहेत. देशभरातील सिनेविश्वातून अनेक मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात आल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. अशा परिस्थितीत, काही काळापूर्वी ‘बाहुबली’ चित्रपटातील कटप्पा, दक्षिण इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्गज अभिनेता सत्यराज (Satyaraj) कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याची बातमीही समोर आली होती. मात्र आता त्यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आहे.

विलगीकरणात होते अभिनेता
सत्यराज यांना शूटिंगदरम्यान कोरोनाची लागण झाली, तेव्हा ते नॉर्मल होते. रिपोर्ट आल्यानंतर तो होम आयसोलेशनमध्ये होते. वृत्तानुसार, तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्यराज यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने, त्यांची कोव्हिड चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. वृत्तानुसार, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना शुक्रवारी (७ जानेवारी), संध्याकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (katappa of baahubali aka sathyaraj deteriorated health hospitalized due to corona)

सत्यराज यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही, परंतु अहवालांवर विश्वास ठेवला तर त्यांना कोरोनाची गंभीर लक्षणे जाणवली आहेत. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तमिळ चित्रपटात आहे मोठे नाव
सत्यराज यांना तमिळ चित्रपटांचे सुपरस्टार म्हटले जाते. त्यांनी १९७८ मध्ये त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र ‘बाहुबली’ चित्रपटातील कटप्पाच्या भूमिकेमुळे ते देशभर लोकप्रिय झाले. ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटात अभिनेता सत्यराजने दीपिकाच्या वडिलांची आणि डॉनची भूमिका साकारली होती.

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा