Tuesday, July 23, 2024

दुःखद! ‘डोरेमॉन’ फेम फुजिको फुजिओ ए यांचे निधन, वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नुकत्याच समोर आलेल्या बातम्यांनुसार, प्रसिद्ध जपानी मंगा कलाकार फुजिको फुजिओ ए (Fujiko Fujio A) यांचे निधन झाले आहे. निंजा हातोडी आणि लहान लिटिल घोस्ट क्यू-टारो यासह मुलांच्या लोकप्रिय व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या फुजिओ ए यांनी वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्थानिक माध्यमांनी गुरुवारी (८ एप्रिल) याबाबत माहिती दिली.

या कलाकाराचे खरे नाव मोटू अबिको असून, ते गुरुवारी टोकियो येथील त्यांच्या घराबाहेर आढळले. कलाकाराच्या निधनाची बातमी समजताच, अनेक कलाकार आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. (tragic doraemon fame fujiko fujio a passed away at the age of 88)

अबिकोचे वडील मध्य टोयामा प्रदेशातील ऐतिहासिक मंदिरात भिक्षू होते. अबिको ते त्यांचे मोठे पुत्र होते. मात्र वडिलांच्या निधनानंतर, त्यांनी कुटुंबासह मंदिर सोडले. त्यावेळी ते केवळ पाचवीत होते.

साल २०२० मध्ये याबद्दल मीडियाशी बोलताना अबिको म्हणाले होते की, “माझ्या वडिलांच्या मृत्यूने माझे आयुष्य सर्वात जास्त बदलले. जर त्यांचे निधन झाले नसते, तर मला वाटते की मी संन्यासी झालो असतो.”

फुजिको फुजिओ एची हायस्कूल दरम्यान हिरोशी फुजीमोटोशी मैत्री झाली, त्यानंतर त्यांनी जपानचे बहुचर्चित कार्टून डोरेमॉन तयार केले आणि कार्टूनच्या यशानंतर या जोडीने एकत्र काम करण्यास सुरुवात केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा