Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड रनबीर कपूरची वधू बनण्यापूर्वी ६ वेळा नवरी बनलीये आलिया, विश्वास नसेल तर बातमी वाचा

रनबीर कपूरची वधू बनण्यापूर्वी ६ वेळा नवरी बनलीये आलिया, विश्वास नसेल तर बातमी वाचा

सध्या हिंदी चित्रपट जगतात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. या शाही विवाह सोहळ्याच्या लग्नाची तयारीही सुरू झाल्याची बातमी समोर आली आहे. अनेक वर्ष त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू होती. दोघे अनेकवेळा एकत्र फिरताना दिसले होते ज्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांंनी जोर धरला होता. मात्र या चर्चांवर दोघांनीही अधिकृत प्रतिक्रिया देणे टाळले होते. मात्र आता दोघांनीही त्यांच्या या प्रेमप्रकरणाच्या बातम्यांना दुजोरा दिला असून दोघेही लवकरच सात फेरे घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. मात्र नववधूच्या पोशाखात मिरवण्याचा हा आलियाचा पहिलाच प्रसंग नाही याआधीही तब्बल ६ वेळा तिने नववधूच्या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

हिंदी चित्रपट जगतातील सर्वात गाजलेली लवस्टोरी म्हणून रणबीर आणि आलियाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दोघेही हिंदी चित्रपट जगतातील पावरफुल कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. अभिनेता रणबीर कपूरने आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर आलियानेही एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देत हम भी किसीसे कम नहीं हे दाखवून दिले आहे.

आता त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याआधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नववधूच्या पेहरावातील आधीच्या लूक्सची चर्चा सुरू झाली आहे. याआधी अनेकदा आलियाने नववधूच्या पेहरावातील लूक्सने सर्वांना मोहित केले आहे.

आलिया भट्ट ही अनेक आघाडींच्या ब्रँन्डसाठी जाहिराती करत असते. आलिया भट्ट ही भारतीय पोशाखांसाठी प्रसिद्ध ब्रँड मन्यावर ‘मोहे’ची ब्रँड अम्बेसेडर आहे आलिया २०१९मध्ये मोहेचीब्रँड अम्बेसेडर बनली आणि तेव्हापासून तिने तिचे वधूचे फोटोशूट अनेक वेळा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये केले. ‘मोहे’साठी, आलियाने कधी तिचा ब्रायडल लूक दाखवला तर कधी फोटोशूटद्वारे प्रशंसा मिळवली. ‘मोहे’पूर्वी आलिया भट्टने चॉकलेट ब्रँड ‘कॅडबरी पर्क’च्या जाहिरातीत तिचा नववधूचा लूक दाखवला आहे. कॅडबरी पर्क जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये, आलिया लग्नाच्या मंडपात जाताना हलक्या गुलाबी रंगाच्या लेहेंगामध्ये दिसली होती. तिच्या या लूकची चांगलीच चर्चा झाली होती.

त्याचप्रमाणे ती २०१४ मध्ये शशांक खेतानच्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात आलिया भट्ट प्रताप सिंगच्या भूमिकेत असलेल्या वरुण धवनची वधू बनली होती. त्याचवर्षी २०१४ मध्येच आलियाने अभिषेक वर्मनच्या ‘टू स्टेट्स’ (2 स्टेट्स) चित्रपटात ‘अनन्या स्वामीनाथन’च्या भूमिकेत नववधूची भूमिका साकारली होती. २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘राझी’ चित्रपट आठवतोय. या चित्रपटात आलिया सेहमत नावाच्या भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसली आहे. चित्रपटातील ‘दिलबरो’ गाण्यात आलियाचा वधूचा लूक पाहायला मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

 

 

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा