Thursday, July 18, 2024

आता काय पैसाच पैसा, लग्नाच्या तयारीत असलेल्या आलिया-रणबीरची एकूण संपत्ती पाहून व्हाल थक्क

सध्या बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  यांच्या लग्नाची जोरदार चर्चा  सुरू झाली आहे. त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याचीही बातमी समोर आली आहे त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे चित्रपट जगतातील सर्वात पावरफुल जोडी म्हणून ओळखली जाते. कारण दोघांनीही आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी चित्रपट जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये आलिया भट्टने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट करत आपली योग्यता सिद्ध केली आहे. तर अभिनेता रणबीर कपूरनेही आपली चॉकलेट बॉयची प्रतिमा जपत सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता अशी ओळख मिळवली आहे. आता या दोघांनीही लग्न केले तर त्यांच्या घरात पैशाचा पाऊस पडेल अशीच त्यांची एकूण कमाई आहे. पाहूया या दोघांची एकूण संपत्तीचे थक्क करणारे आकडे. 

आलिया भट्टची संपत्ती – ‘गंगुबाई काठियावाडी’च्या दमदार यशानंतर आलियाने दाक्षिणात्य चित्रपट जगतात पाऊल ठेवत ‘आरआरआर’ सारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे आलियाच्या मानधनातही मोठी वाढ झाली आहे. तसेच आलिया भट्टच्या नावाचा समावेश हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीतही प्रामुख्याने समावेश होतो. समोर आलेल्या माहितीनुसार २०२१ पर्यंत आलिया भट्टची एकूण १६२ कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. ही अभिनेत्री महिन्याला तब्बल ६० लाख रुपये कमावते. तसेच ती प्रत्येक चित्रपटासाठी ८-१० कोटी इतके मानधन घेते.

रणबीर कपूरची संपत्ती  – बॉलिवूड जगतावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या कपूर खानदानाचा वारसदार असलेल्या रणबीरने आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपट जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच त्याचे नाव हिंदी चित्रपट जगतातील यशस्वी अभिनेत्यांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते. या यशामुळेच रणबीरने छोट्या वयात मोठी संपत्ती गोळा केली आहे. २०२१ पर्यंतच्या माहितीनुसार त्याच्याकडे ३३० कोटीची संपत्ती आहे. तर तो प्रत्येक चित्रपटासाठी ७- ८ कोटी इतके मोठी मानधन घेतो.

रणबीर आलियाचे कार कलेक्शन – हिंदी चित्रपट जगतातील अभिनेते आणि अभिनेत्रींना आलिशान गाड्यांची खूप आवड असते. त्यामुळेच आलिया आणि रणबीरच्या ताफ्यातही अनेक दमदार आलिशान गाड्या आहेत. ज्यामध्ये आलियाकडे ऑडी क्यू 7, ऑडी क्यू 5, ऑडी ए 6, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, लैंड रोवर, रेंज रोवर, अशा महागड्या गाड्यांचा ताफा आहे. तर अभिनेता रणबीर कपूरकडेही ऑडी, रेंज रोवर, बीएमडब्लु, मर्सिडिज सारख्या महागड्या कंपनीच्या गाड्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

 

 

हे देखील वाचा