Thursday, April 18, 2024

“माझ्याच माणसाची नव्याने ओळख” महाराष्ट्र्र शाहीर सिनेमापाहून भारावलेल्या दीपा परबने नवऱ्याचे कौतुक करताना लिहिले…

केदार शिंदे दिग्दर्शित आणि बहुप्रतिक्षित असा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाने इंडस्ट्रीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठा बज निर्माण केला होता. सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सिनेमा हिट होत असताना दुसरीकडे सिनेमातील कलाकारांचे आणि खास करून अंकुश चौधरीचे तुफान कौतुक होत आहे. अंकुशने शाहीर साबळे यांची भूमिका पेलण्याचे जे शिवधनुष्य उचलले होते त्याला त्याने पूर्ण न्याय दिला असल्याची भावना प्रेक्षक आणि कलाकारांकडून व्यक्त केली जात आहे.

अशातच अंकुशची पत्नी आणि अभिनेत्री असलेल्या दीपा परबने देखील त्याच्या कामाचे कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. दीपाची ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहे. दीपाने शेअर केलेल्या तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “आज १ मे, महाराष्ट्र दिन…२८ एप्रिलला अंकुशचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. खरंतर मी तो एक दिवस आधीच पाहिला होता आणि तेव्हापासून मी पुर्णतः निःशब्द झाले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी मला माझ्या प्रतिक्रिया विचारल्या पण काय बोलू? काय सांगू? कळतच नव्हतं. फक्त अंकुशची बायको म्हणूनच नव्हे तर एक कलाकार म्हणून, एक सुजाण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीने मला खूप काही दिलं, शिकवलं, घडवलं आणि मुख्य म्हणजे माझ्याच माणसांची मला नव्याने ओळख करुन दिली.”

पुढे दीपाने लिहिले, “बायको म्हणून मला अंकुशचा खूप खूप खूप अभिमान वाटतो. आज फक्त त्याची बायको म्हणून नाही तर त्याची फॅन म्हणून सुद्धा मी पुन्हा एकदा नव्याने त्याच्या प्रेमात पडले. ह्या चित्रपटासाठी एक अभिनेता म्हणून त्यांनी घेतलेल्या मेहनतीची मी स्वतः साक्षीदार आहे. ‘याची देही याची डोळा’ ज्यांना बघत, ज्यांच्या सहवासात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली त्यांचीच भूमिका आज साकारायला मिळणं यासारखा दुग्धशर्करा योग नव्हे. आणि यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे बळ कदाचित बाबांकडून त्यांना मिळाले असावे. चित्रपट बघताना काही क्षणानंतर अंकुश चौधरी दिसतच नाही आणि दिसतात ते पूर्णतः शाहीर साबळे. अभिनेता म्हणूनच नव्हे तर वास्तविक आयुष्यात क्षणिक का होई ना पण तुम्ही ही भूमिका आत्मसात करत ती जगलात हेच एक अभिनेता म्हणून तुमचं यश आहे. आणि म्हणूनच आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी महाराष्ट्रतील सर्व रसिक प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहण्याची मी विनंती करते.”

दरम्यान दीपाची ही पोस्ट कमालीची व्हायरल होत असून, तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसोबतच कलाकारांनी देखील त्यांच्या कमेंट्स दिल्या आहेत. दीपा देखील उत्तम अभिनेत्री असून सध्या तिची टीव्हीवर ‘तू चाल पुढे’ ही मालिका सुरु असून, मालिका जोरदार गाजत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा