Saturday, December 7, 2024
Home अन्य वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या मिशेल मार्शला मराठी अभिनेत्याने फटकारले; लोक म्हणाले, ‘माज…’

वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या मिशेल मार्शला मराठी अभिनेत्याने फटकारले; लोक म्हणाले, ‘माज…’

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19नोव्हेंबरला विश्वचषक 2023चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केल्याने संपूर्ण देशभरात सध्या नाराजीचं वातावरण पसरलं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंसह लाखो क्रिकेटप्रेमी भारताच्या पराभवानंतर हळहळले. या अंतिम सामन्याबद्दल क्रीडा क्षेत्रासह राजकीय, मनोरंजन कलाविश्वातून दिग्गजांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

विश्वचषक जिंकल्यावर ऑस्ट्रेलिया संघाचे वर्ल्डकपबरोबरचे आणि पार्टी करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधील एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्श खुर्चीवर बसलेला असून त्याच्या हातात एक बाटली आहे. खुर्चीवर बसून त्याने चक्क विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवल्याचं दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

या फोटोवर प्रतिक्रिया देताना स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, “आपल्यावर पूर्वापार झालेले ‘संस्कार’…पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या प्रत्येकाने ग्राह्यच मानावेत…त्यानुसारच जगावं..अन्यथा… याच हट्टाग्रहाने जगात दहशतवाद आणला असेल ना…?!” सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, “कधीतरी त्यांचा अहंकार त्यांनाच खाणार मार्क माय वर्ड्स…मान्य आहे की आमचा संघ चुकीचा खेळला पण क्रिकेटपासून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा कधीही अपमान केला नाही.” दुसऱ्याने लिहिले की, “माज आणि मस्ती दुसरं काय” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

आधिक वाचा-
डेंग्यू झाल्यानंतर भूमी पेडणेकरने प्रकृतीबाबत दिले अपडेट; म्हणाली, ‘एका डासाने मला आठ दिवस…’
सलमान खानची गोव्यात धमाल, भरगर्दीत महिलेला केलं किस, व्हिडिओ तूफान व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा