Thursday, April 18, 2024

‘मी तिला 3 लाख रुपये दिले’, तुनिषाला पैसे न दिल्याच्या आरोपावर आई वनिताचे खळबळजनक विधान

सध्या तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने शोच्या सेटवर आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. जिथे एकीकडे तुनिषाच्या आईने सहअभिनेता आणि अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड शीजान खानवर सर्व आरोप केले आहेत. त्याचवेळी शीजान खानच्या आई आणि बहिणींनीही पत्रकार परिषदेद्वारे तुनिषासोबतच्या त्यांच्या नात्याचा खुलासा केला. आणि आता या आत्महत्या प्रकरणाच्या संबधित आणखी एक खुलासा झाला आहे.

शीजान खानच्या कुटुंबियानी लावलेल्या आरोपांवर तुनिषा शर्माची आई:
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला हादरवून टाकले आहे. अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी तिचा माजी प्रियकर आणि सहकलाकार शीजान खानविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, शीजान खान सध्या 13 जानेवारी 2023 पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. तुनिषाच्या आईने शीजानच्या कुटुंबावर आरोप केले होते, ज्याला उलट उत्तर देत शीजानच्या कुटुंबीयांनी तुनिषाच्या आईवरच गंभीर आरोप केले आहेत.

शीजानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, तुनिषाची आई वनिता ही अभिनेत्री तुनिषा आणि तिच्या पैशांवर नियंत्रण ठेवत असे. ती अभिनेत्री तुनिषाचा पैशासाठी छळ करत असे. यासोबतच एकदा तिने तुनिषाचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला होता. आता तुनिषाच्या आईने या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना तुनिषाच्या आईने शीजानच्या कुटुंबीयांनी लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

तुनिषाला पैसे न दिल्याचा आरोपावर आई वनिता शर्मा:
तुनिषाची आई म्हणाली, “मी शीजानला सोडणार नाही. मी माझी मुलगी गमावली. नातं समजून घेण्यासाठी मी इथे आलेले नाहीये. मला न्याय हवा आहे शीजान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब यात सहभागी आहे. तुनिषा माझे जीवन होती. तिने माझ्यापासून कधीच काही लपवले नाही. गेल्या 3-4 महिन्यांपासून ती शीजानच्या कुटुंबाच्या जास्त जवळ गेली होती. शीजानच्या संपूर्ण कुटुंबाने तुनिषाचा वापर केला आहे.” तुनिषाला पैसे न दिल्याच्या आरोपावर वनिता म्हणाली, “शीजानच्या आईचा दावा आहे की मी तिला (तुनिषाला) पैसे दिले नाहीत. मी तिला तीन महिन्यांत तीन लाख रुपये दिले आहेत. तुम्ही माझे बँक स्टेटमेंट पाहू शकता.”

शीजानच्या ड्रग्जवर बोलली तुनिषाची आई:
तुनिषाच्या आईने असेही सांगितले की शीजान ड्रग्ज घेत असे आणि तुनिषालाही घेण्यास भाग पाडत असे. वनिता म्हणाली, “ब्रेकअपच्या वेळी तिला खूप वेदना होत होत्या. ती मला सांगायची, ‘माझी फसवणूक झाली आहे. शीजानने माझा वापर केला आहे.’ मी तिला शोवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. शीजानने तुनिशाला चापटही मारली होती. तुनिषा तिच्या मैत्रिणींना म्हणाली होती शीजान ड्रग्स करतो आणि तिलाही करायला भाग पाडतो. त्यामुळे तुनिषाने सुद्धा सिगारेट ओढायला सुरुवात केली होती. आता मला सर्व रिपोर्ट्स हवे आहेत.”

याशिवाय तुनिषाच्या आईने असेही सांगितले की, तिने तुनिषाला दिलेले ३ लाख रुपये तिने शीजान खानसाठी ड्रग्ज विकत घेण्यासाठी खर्च केले असावेत. तुनिशाची आई म्हणाली, “तुनिषाला मी तीन महिन्यांत दिलेले 3 लाख रुपये तिने कुठे खर्च केले याची मला कल्पना नाही. तिने ड्रग्ससाठी कर्च केलेले असू शकतात. ते ड्रग्स मालाडहून नेण्यासाठी ती माझ्याच कारचा वापर करायची.”

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ यांना ‘ती’ चूक पडलेली महागात; विनोद खन्नांना केले होते रक्तबंबाळ, आजही होत असेल पश्चाताप
अमृता फडणवीसांचं गाणं पाहून देवेंद्रजींची प्रतिक्रिया; पत्नीनेन सांगितले,’ते ट्रोलिंगला घाबरले कारण…’

हे देखील वाचा