आनंदाची बातमी! ‘या’ अभिनेत्याची कोरोनावर यशस्वी मात; ५५ दिवसांनंतर मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज


एक वर्षापेक्षा अधिक काळ कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला आहे. यादरम्यान सामान्य व्यक्ती तर सोडाच, छोट्या तसेच मोठ्या पडद्यावरील दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. सोबतच अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. यापैकीच एक असलेला टीव्ही अभिनेता म्हणजे अनिरुद्ध दवे होय. अनिरुद्ध मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरसविरुद्ध रुग्णालयात झुंज देत होता. सुरुवातीला त्याची तब्येत खूपच खालावली होती. मात्र, हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली. आता तब्बल ५५ दिवसांनंतर अनिरुद्धला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर अनिरुद्धने रुग्णालयाच्या बाहेर डॉक्टर आणि कर्मचारी सदस्यांसोबत खास फोटो शेअर करत सर्वांना धन्यवाद दिला आहे. (TV Actor Aniruddh Dave Discharge From Hospital After 55 Days Says Zindagi Aa Raha Hoon Main)

अभिनेत्याने ट्वीट करत लिहिले की, “किती चांगला क्षण आहे. ५५ दिवसांनंतर चिरायू रुग्णालयातून डिस्चार्ज झालो आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद. ऑक्सिजन नाही, तर आता स्वत:चा श्वास घेत आहे. जीवन येत आहे मी (जिंदगी आ रहा हूँ मैं).”

अनिरुद्धला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे. त्याचे सर्व चाहते त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हाव्या म्हणून प्रार्थना करत होते.

म्हणाला होता, ‘मी आपल्या घरी जाईल’
काही दिवसांपूर्वी अनिरुद्धने म्हटले होते की, तो लवकरच घरी येणार आहे. त्याने लिहिले होते की, “फक्त आणखी काही दिवस. त्यानंतर मला लवकरच डिस्चार्ज मिळेल, आणि मी आपल्या घरी जाईल.”

पत्नीने दिली साथ
अनिरुद्धच्या या कठीण काळात त्याच्या पत्नीने तिला खूप साथ दिली. त्याने त्याच्या पत्नीसाठी एक पोस्ट लिहिली होती की, “मी तर ३० पर्यंत पराभव स्वीकारला होता, आणि १, २ ला जेव्हा तू मला पाहायला आली होती. मात्र, त्यावेळी मी कोणालाही ओळखू शकत नव्हतो, पण कोणीतरी सांगितले की, सुभी तुला भेटायला आयसीयूमध्ये आली होती. मी फक्त एवढाच विचार करत राहिलो की, वॅक्सिन न घेता तू मला भेटायला आली होती, तेही आपल्या मुलाला सोडून. जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की, परिस्थिती गंभीर आहे, तेव्हा तू आणि मुलाने मला धैर्य दिले.”

त्याने सांगितले की, सुभीने त्याला तू लवकर बरा होऊन मुलाला स्विमिंग, स्केटिंग आणि घोडेस्वारी शिकवायची आहे, असे म्हणत प्रेरित केले.

अनिरुद्धने ‘लव्हस्टोरी’ आणि ‘पटियाला बेब्स’ यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. त्याच्या कामाला सर्वांकडून पसंती मिळाली आहे. इतकेच नाही, तर आता अनिरुद्ध अक्षय कुमारसोबत ‘बेल बॉटम’मध्येही झळकणार आहे. हा चित्रपट येत्या २७ जुलै, २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.