Saturday, September 30, 2023

‘खूपच खराब…, अजिबात नका जाऊ, पैसे वाचवतोय मी तुमचे’, अभिनेत्याने केला ‘Barbie’चा प्रामाणिक रिव्ह्यू

भारतातच नाही, तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर राज्य करणारा सिनेमा म्हणजे ‘बार्बी‘ होय. हा हॉलिवूड सिनेमा सर्वत्र वाहवा मिळवत आहे. मात्र, हा सिनेमा अनेकांना आवडलेला नाहीये. यामध्ये टीव्ही अभिनेता जय भानुशाली याच्या नावाचाही समावेश आहे. जय त्याच्या मुलीसोबत रविवारी (दि. 23 जुलै) बार्बी सिनेमा पाहण्यासाठी गेला. आता त्याने इंस्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत ‘बार्बी’ हा सिनेमा नक्की कसा वाटला, हे सांगितले आहे.

जयला कसा वाटला ‘बार्बी’ सिनेमा?
टीव्ही अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) याने ‘बार्बी’ (Barbie) सिनेमाचा रिव्ह्यू केला. त्याने म्हटले की, “मी एक सूचना देऊ इच्छितो. सूचना ही आहे की, तुम्ही लोकांनी इंटरनेटवर आतापर्यंत असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, जिथे सर्वजण गुलाबी कपडे घालून बार्बी सिनेमा पाहायला थिएटरमध्ये जात आहेत. त्यापैकी मी पण एक होतो. हे सर्व पाहून मी विचार केला की, मी माझ्या मुलीला घेऊन बार्बी सिनेमा पाहायला का जाऊ नये. विश्वास ठेवा खूप वाईट आहे. तुम्हाला वाचवतोय मी. तुमचे पैसे वाचवत आहे आणि तुमचे मानसिक संतुलन वाचवत आहे. कारण, यापेक्षा वाईट सिनेमा मी आजपर्यंत पाहिला नाही.”

‘खूपच खराब सिनेमा’
“हा खूपच खराब सिनेमा आहे. ही जेवढी हवा तुम्ही पाहत आहात, सिनेमा पाहिल्यानंतर कुणीही पाहण्यासाठी पात्र नाहीये. मलाही दोन दिवस गेले आणि मी आता दोन दिवसांपासून विचार करत आहे की, हा काय सिनेमा बनवलाय. मला वाटले होते की, मुलांसाठी हा सिनेमा असेल, पण हा मुलांसाठीही नाही आणि मोठ्यांसाठीही नाहीये.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “एक गोष्ट अशी आहे की, मी पैसे दिले होते, तेव्हा मी विचार केला की, कसं तरी सिनेमाचा शेवट पाहू. तसेच, सिनेमा सुरू होण्याच्या अर्ध्या तासानंतर माझी मुलगी मला म्हणाली की, ‘पप्पा मला झोप येत आहे. मी हा सिनेमा पाहू शकत नाही. तुम्ही मला घरी घेऊन चला, हे खूप कंटाळवाणे आहे.’ मी म्हणालो की, बाळा हा चांगला सिनेमा आहे. त्यानंतर तिने मला जो लूक दिला, अला लूक मला माझ्या मुलीने कधीच दिला नाही.”

खरं तर, ‘बार्बी’ सिनेमा जगभरात जरी चालत असला, तरीही भारतात या सिनेमाला फार चांगली कमाई करता आली नाहीये. भारतात ‘ओपेनहायमर’ या सिनेमाने ‘बार्बी’ला मागे टाकले आहे. सिलियन मर्फी (Cillian Murphy) अभिनित ‘ओपेनहायमर’ सिनेमाने भारतात इंग्रजी भाषेत 5 दिवसात 54.19 कोटी रुपये कमावले आहेत. मंगळवारी (दि. 25 जुलै) ‘ओपेनहायमर’ सिनेमाची कमाई 5.54 कोटी होती, तर ‘बार्बी’ने फक्त 2.3 कोटीच कमावले.

महत्त्वाच्या बातम्या-
दोन आठवडे घाम गाळून अभिनेत्याने अंधारात शूट केले ऍक्शन सीन्स, 300 कोटी बजेटचा सिनेमा कधी होणार रिलीज?
‘लोकांना वाटायचं मी ड्र’ग्ज घेते, चारित्र्यहीन…’, अभिनेत्री कल्कीच्या वेदना आल्या समोर

हे देखील वाचा