‘देव डी’ आणि ‘ये जवानी है दीवानी’ यांसारख्या सिनेमात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलिन होय. कल्कीने नुकताच धक्कादायक खुलासा करत सांगितले आहे की, गोऱ्या रंगामुळे अडचण निर्माण झाली होती. इतकेच नाही, तर तिला कास्टिंग काऊचचीही शिकार व्हावे लागले होते. अशात अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने वेदना व्यक्त केल्या आहेत. चला तर ती काय म्हणालीये, जाणून घेऊयात…
कल्की कोचलिन (Kalki Koechlin) ही तिच्या आगामी ‘मेड इन हेवन 2’ वेब सीरिजमध्ये पुन्हा एकदा ‘फैजा’ पात्र साकारणार आहे. या मालिकेसाठी चाहतेच नाहीत, तर अभिनेत्रीही भलतीच उत्सुक आहे. आज यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या कल्कीला कारकीर्द घडवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला होता. कल्कीला गोऱ्या रंगामुळे अडचण व्हायची. तिला वेगवेगळ्या गोष्टी ऐकाव्या लागायच्या. अशात यावर तिने मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.
कल्कीचा जन्म पाँडिचेरीच्या एका फ्रेंच कुटुंबात झाला होता. तिचे आई-वडील जरी मूळचे फ्रेंच असले, तरीही त्यांची भाषा भारतीयच होती. असे असूनही कल्कीला खूपच भेदभावाचा सामना करावा लागायचा. नुकतेच एका शोमध्ये कल्कीने आपल्या आयुष्यातील अनुभव शेअर केला.
View this post on Instagram
काय म्हणाली कल्की?
संवादादरम्यान कल्की म्हणाली की, “मी हा भेदभाव लहानपणापासून पाहिला आहे. लोकांना वाटायचे की, मी ड्र’ग्ज घेते. कारण, माझ्या ग्रूपमध्ये मी एकटीच खूप गोरी मुलगी होते. माझा रंग खूपच गोरा आहे, यात माझी काय चूक आहे. खूपच जास्त गोरा रंग असल्यामुळे लोक माझ्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. मात्र, मी जेव्हा तमिळ भाषेत उत्तर द्यायचे, तेव्हा लोक मला अक्का आणि ताई म्हणायचे. माझी भाषा ऐकून त्यांचे विचार बदलायचे.”
कल्की कोचलिन कास्टिंग काऊच अनुभवावरही बोलली. ती म्हणाली की, “मी एका सिनेमासाठी ऑडिशन दिले होते. यानंतर मला सांगण्यात आले की, निर्मात्याला भेटावे लागेल. जेव्हा मी ऑफिसात निर्मात्याला भेटायला गेले, तेव्हा त्याने म्हटले की, ‘हे पाहा, ही तुझ्यासाठी मोठी संधी आहे. मला तुला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचे आहे. तू माझ्यासोबत डिनरवर येणार का?’ इतकेच ऐकल्यानंतर मला समजले होते की, त्यांना काहीतरी चुकीचे करायचे आहे. त्यावेळी मी त्यांना म्हटले की, मी त्या टाईपची मुलगी नाहीये.”
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, “लोक माझ्याविषयी सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट्स करायचे की, जास्त हसू नको. तुझे दात खूप मोठे आहेत. मला आठवते की, जेव्हा मी 36 वर्षांची होते, तेव्हा एक मेकअप आर्टिस्टने मला म्हटले होते की, तो माझ्या डोळ्यात आय लायनर लावू शकत नाही. कारण, माझ्या डोळ्यांजवळ सुरकुत्या आहेत.”
अशाप्रकारे अभिनेत्री कल्की कोचलिन हिने गोरा रंगामुळे होणारी अडचण आणि कास्टिंग काऊचविषयी मनमोकळेपणाने भाष्य केले. कल्कीविषयी बोलायचं झालं, तर ती ‘मेड इन हेवन 2’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ही वेबसीरिज 11 ऑगस्ट रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज केली जाणार आहे. (actress kalki koechlin talks about white girl phenomenon and casting couch experience said this read more)
महत्त्वाच्या बातम्या-
बाबो…’बार्बी’ची गाडी एकदम सुसाट! कमाईच्या बाबतीत ‘मिशन इम्पॉसिबल- 7’लाही पछाडले, मंगळवारची कमाई उडवेल झोप
‘आम्ही तुमच्यामुळेच…’, Kargil Vijay Diwasच्या निमित्ताने अक्षय कुमारने काढली शूरवीरांची आठवण