Sunday, October 1, 2023

दोन आठवडे घाम गाळून अभिनेत्याने अंधारात शूट केले ऍक्शन सीन्स, 300 कोटी बजेटचा सिनेमा कधी होणार रिलीज?

पुढील वर्षी म्हणजेच 2024मध्ये साऊथ इंडस्ट्रीतील एकापेक्षा एक बिग बजेट असलेले सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यामध्ये ‘पुष्पा 2‘, ‘लिओ’, ‘प्रोजेक्ट के’, ‘कंगुवा’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमांमध्ये साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याच्या ‘देवरा’ सिनेमाचाही समावेश आहे. बिग बजेट असलेल्या या सिनेमाची खासियत म्हणजे, हा एनटीआरचा 30वा सिनेमा आहे. या सिनेमातून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. या सिनेमाचे काम वेगाने सुरू आहे आणि नुकतेच सिनेमातील ऍक्शन सीन शूट करण्यात आले आहेत.

ज्युनिअर एनटीआर (JR NTR) अभिनित ‘देवरा’ (Devara) हा सिनेमा ऍक्शन ड्रामा असेल. या सिनेमात अनेक खास सीक्वेन्स पाहायला मिळतील. अशात सिनेमाच्या प्रत्येक सीनविषयी माहिती समोर येत आहे. नुकतेच सिनेमासाठी काही ऍक्शन सीक्वेन्स शूट करण्यात आले. हे ऍक्शन सीन खूपच कठीण होते. कारण, हे सीन कमी सूर्यप्रकाशात शूट केले जाणार होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

तब्बल 300 कोटी रुपयांचे बजेट
ज्युनिअर एनटीआर याच्या ‘देवरा’ सिनेमाचे दिग्दर्शन शिवा कोरतला करत आहेत. या सिनेमाचे काम वेगाने सुरू आहे. या सिनेमातील सर्वात महत्त्वपूर्ण ऍक्शन सीनचे चित्रीकरण करण्यात आले आहे. खरं तर, ‘देवरा’ सिनेमातील ऍक्शन सीन व्हीएफएक्स परफेक्ट असावा म्हणून अभिनेता आणि शिवाने सर्वप्रथम ऍक्शन सीनचे चित्रीकरण केले आहे. जेणेकरून व्हीएफएक्स टीमला एडिटिंगसाठी पुरेसा वेळ मिळेल.

कथेच्या मागणीनुसार, सीन अंधारात शूट होणार होते. अशात हैदराबाद स्टुडिओमध्ये मोठा सेट तयार करण्यात आला होता. कमी सूर्यप्रकाशात 2 आठवडे एनटीआरने सिनेमासाठी ऍक्शन सीन शूट केले आहेत. खरं तर, सिनेमात सैफ अली खान (Saif Ali Khan) याची महत्त्वाची भूमिका आहे. असे म्हटले जात आहे की, तो खलनायकाच्या भूमिकेत असेल. तसेच, जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हीदेखील लवकरच या सिनेमाची शूटिंग सुरू करेल. हा सिनेमा पुढील वर्षी 5 एप्रिल रोजी रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे. (devara movie actor junior ntr shoots brutal and bloody action scene for 2 weeks 300crore movie releasing on this day next year)

महत्त्वाच्या बातम्या-
‘लोकांना वाटायचं मी ड्र’ग्ज घेते, चारित्र्यहीन…’, अभिनेत्री कल्कीच्या वेदना आल्या समोर
बाबो…’बार्बी’ची गाडी एकदम सुसाट! कमाईच्या बाबतीत ‘मिशन इम्पॉसिबल- 7’लाही पछाडले, मंगळवारची कमाई उडवेल झोप

हे देखील वाचा