Monday, June 24, 2024

कृष्णा पुन्हा एकदा बोलला मामा गोविंदाबद्दल; म्हणाला, ‘त्याने माझ्या जवळ यावे, मला…’

बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक त्यांच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. मामा-पुतण्याचे भांडण जगजाहीर आहे. यावरून दोन्ही कुटुंबात बराच वादही झाला होता. त्याचवेळी, कृष्णा अभिषेकने पुन्हा एकदा त्याचे मामा गोविंदाबद्दल असे काही सांगितले, ज्यावर चाहत्यांना विश्वास बसणार नाही.

वादानंतर आता कृष्णा अभिषेकला त्याचे मामा गोविंदासोबत पॅचअप करायचे आहे. एक काळ असा होता की, कृष्णा आणि गोविंदा यांच्यात खास बॉन्डिंग पाहायला मिळायची. त्यांच्यातील प्रेम प्रसिद्धीच्या झोतात आले होते, पण नंतर अचानक त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि घरगुती भांडण बाहेर आले. त्याच वेळी, आता कृष्णाला त्याच्या मामासोबतचे नाते ठिक करून सर्व अंतर दूर करायचे आहे.

कृष्णा अभिषेकने नुकेतच माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मामा गोविंदाबद्दल आपले मत सांगितले. तो म्हणाला, “मी तो माझ्याकडे येण्याची वाट पाहत आहे, मला शिवीगाळ करा, हवे ते करा पण आमच्यात सर्व ठीक करा.” यावरून हे स्पष्ट होते की, कुठेतरी कृष्णाला त्याच्या मामाची खूप आठवण येत आहे आणि पुन्हा त्यांच्यात सर्वकाही ठिक व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.

कृष्णा अभिषेक पुढे म्हणाला, “जया बच्चन आणि शाहरुख खान ज्या प्रकारे ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात एकत्र आले होते. असंच काहीतरी घडू दे. आम्ही कुठेतरी भेटू, याची मी वाट पाहतोय. तो माझा मामा आहे. मला माहित आहे की, आज नाही तर उद्या आपण एकत्र असू. माझा विश्वास आहे की, रक्त पाण्यापेक्षा गाढ नाही. दुसरीकडे माझी मावशी सुनीता यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर ती माझी आई आहे. तिला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला माहित आहे की, एक दिवस सर्वकाही पूर्वीसारखे होईल.”

कृष्णा अभिषेक विषयी बाेलायचे झाले, तर त्याला ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातून खरी ओळख मिळाली.(tv actor krushna abhishek shares current equation with actor govinda now he wants again patch up with mama)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हेमा मालिनीला धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीचा वाटताे हेवा? सिमी ग्रेवालच्या शोमध्ये अभिनेत्रीने केला खुलासा

राखी सावंतचा प्रेग्नेंसी अन् मिसकॅरेजवर धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘ऑपरेशननंतर आदिलने माझ्यासोबत…’

हे देखील वाचा