Sunday, April 14, 2024

‘मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झाली आहे’ विधानावर संतापले मुकेश खन्ना, म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वारंवार धार्मिक-जातीय तणावाच्या घटना घडत आहेत. पुन्हा एकदा संगमनेर आणि कोल्हापूर येथे जातीय तिढा निर्माण होतील अशा घटना घडल्या. यावरून राजकीय नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. तसेच कलाकार देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत. यावरून सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. यावरून गेल्या काही दिवसांपुर्वी नसीरुद्दीन शाह यांना मत व्यक्त केल होतं.

नसीरुद्दीन शाह यांनी मुस्लिमांबद्दल वक्तव्य केल होत. त्यावरून ज्येष्ठ कलाकार मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की, आजकाल मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन झाली आहे. सुशिक्षित लोकही हे करत आहेत. या वक्तव्यावर आता मुकेश खन्ना यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

यूट्यूबवर शेअर केलेल्या नवीन व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना नसीरुद्दीन शाह यांच्याबद्दल बोलत आहेत. तसेच नसीरुद्दीन शाह यांच्यासारखा प्रतिभावान कलाकार आता कसा कट्टर झाला आहे हेही सांगितले. मुकेश खन्ना यांनी 2018 मध्ये नसीरुद्दीन यांच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. त्यावेळी नसीरुद्दीन म्हणाले होते की, जेव्हा त्यांची मुले रस्त्यावरून जात होती आणि त्यांचा धर्म विचारला गेला तेव्हा मला खूप भीती वाटत होती.

त्यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहीले की, “भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत, असे म्हणतात! साक्षी, श्रद्धा, अंकिताची घटना, कानपूरच्या हनुमान मंदिरातील तोडफोड या डेंजर घटना आहेत. आपल्या देशात मुस्लिम सुरक्षित नाहीत हे तुम्ही सांगता. अरे, फक्त 100 कोटी हिंदू सुरक्षित नाहीत. तू कट्टर झाला आहेस, जो अभिनेत्याला शोभत नाही. असे असेल तर लव्ह जिहादच्या टीमला प्रोत्साहन देणाऱ्या टोळीत सामील व्हा. या गोष्टीचा तुला विचार करावा लागेल अन्यथा लोक तुमचे चित्रपट पाहणे बंद करतील.”

मुकेश खन्ना यांनी मुस्लिम समाजातील लोकांच्या हातून झालेल्या भीषण हत्या आणि भीषण घटनांचा उल्लेख केला. तसेच भारतात मुस्लिम असुरक्षित नाहीत, पण हिंदू सुरक्षित नाहीत, असेही ते म्हणाले. नसीरुद्दीन शाह यांच्या ताज्या वक्तव्यावरही त्यांनी खरपूस समाचार घेतला. (Veteran actor Mukesh Khanna criticized Naseeruddin Shah)

हेही वाचा-
इश्क का रंग सफेद! गौरी कुलकर्णीचे प्रेमात पाडणारे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल
लग्नाच्या 7 वर्षांनंतर गरोदर झालेल्या विदिशाने शेअर केले फोटो, पोज देत दाखवले बेबी बंब

हे देखील वाचा